तरुण भारत

मोटरसायकल चोरट्यास पोलिसांनी केले अटक

प्रतिनिधी / शिरोळ

संशयित रित्या फिरणाऱ्या महादेव निवृत्ती सातपुते वय वर्षे 40  मायाका नगर कवलापुर ता मिरज जिल्हा सांगली या  मोटारसायकलस्वार ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.  त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की  पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेशोध पथकास सदर गुन्हा उघडीस आणण्याबाबत सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी आदेश दिले होते. 
शिरोळ अर्जुनवाड रोड वरील सौरभ सर्विहसिंग सेंटर जवळ एक इसम मोटरसायकल संशयित फिरत असल्याचे खबर यामार्फत माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला  सागर खाडे हनुमंत माळी यांनी सदर इस माकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगली येथील आनंद टाकी समोर असलेल्या कृष्णा हॉटेल समोरील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली संशयित आरोपी महादेव सातपुते यांच्याकडून मोटारसायकल जप्त करून सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस हवालदार ज्ञानेश शीतल भोसले यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

उद्दिष्टपूर्तीसाठी रोज कोरोना लसीकरण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वाकरेतील एकाच कुटुंबातील 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

पोलिस असल्याचे भासवत वृद्धास ६५ हजाराला लुबाडले

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पंचगंगा नदी पात्रास अडथळा ठरणाऱ्या पुलांच्या भरावाबाबत लवकरच निर्णय – पालकमंत्री

Abhijeet Shinde

शिरोलीचे सरपंच कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!