तरुण भारत

श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर किमान मुखदर्शनासाठी खुले करा

प्रतिनिधी / कुरुंदवाड

महाराष्ट्र सह कर्नाटक, गोवा आदि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरोळ तालुक्यातील दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. व या मागणीचा भाविक व नागरिक यांच्याकडून दबाव वाढत आहे. शासनाचे सर्व नियम पाळून किमान मुखदर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी पत्रकार परिषदेत आज सायंकाळी बोलताना केली. या वेळी सचिव गोपाळ पुजारी, विश्वस्त विकास पुजारी, प्रा.गुंडो पुजारी, श्रीकांत पुजारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष पुजारी म्हणाले की, याबाबत भाविक व नागरिकांच्या मागणीचे लेखी निवेदन श्री दत्त देव संस्थान मार्फत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे. ना. सतेज पाटीलसो, पालकमंत्री कोल्हापूर,.डॉ. राजेंद्रपाटील यड्रावकर,. आरोग्य मंत्री, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई  कोल्हापूर यांना देण्यात आले आहे. असे सांगून पुजारी पुढे म्हणाले की, गेले 7 महीने देवस्थानचे नित्यपूजा अर्चा चालू असून दसरा महोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय आहे. मंदिरे बंद असलेने सर्वांनाच क्लोज सर्किट टीव्हीवर दर्शन घेण्याचा प्रसंग देवस्थानच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाला आहे. सर्वच भाविक दत्त दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

Related Stories

विज्ञान प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ

Abhijeet Shinde

इचलकरंजी : ‘त्या’ बैठकीतील माजी उपनगराध्यक्षांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : चिंचवाडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, २१ जणांवर गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

संभाव्य महापुराचा धोका नाही : मंत्री शशिकला जोल्ले

Abhijeet Shinde

राज्यातील पतसंस्थांना आता नवीन व्याजाचे निकष लागू होणार

Abhijeet Shinde

राधानगरी वनपर्यटनातून विकलांग विद्यार्थी झाले प्रफुल्लित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!