तरुण भारत

सोमवारी जिल्हय़ात कोरोनाचे 180 नवे रुग्ण

दोन महिलांसह तिघा जणांचा मृत्यू, रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 88 जणांचा समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सोमवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 180 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर गोकाक, कागवाड, रायबाग येथील दोन महिलांसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 88 जणांचा समावेश आहे. बाधितांची संख्या वाढत चालली असून गेल्या आठवडय़ाभरात मृतांचा आकडा मात्र घटला आहे.

शहर व उपनगरांतील 68 व ग्रामीण भागातील 20 असे एकूण तालुक्मयातील 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये सेवा बजावणाऱया चार खासगी डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बिम्ससह वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये काम करणाऱया पाच वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

भाग्यनगर, भांदुर गल्ली, कॅम्प, चव्हाट गल्ली, देशपांडे गल्ली, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, उचगाव, विनायकनगर, अनगोळ, अंजनेयनगर, अन्नपूर्णवाडी, अशोकनगर, अजमनगर, टिचर्स कॉलनी, भेंडीगेरी, गौंडवाड, हलगीमर्डी, हिरेबागेवाडी, काकती, मुतगा, पंतबाळेकुंद्री, पारिश्वाड, गणेशपूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

कावेरीनगर, खडेबाजार, कुलकर्णी गल्ली, कुमारस्वामी लेआऊट, कुवेंपूनगर, महांतेशनगर, हिंदवाडी, मंडोळी रोड, नेहरुनगर, न्यू वैभवनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, समर्थकॉलनी-लक्ष्मीनगर, सावरकररोड-टिळकवाडी, शास्त्राrनगर, श्रीनगर, सुभाषमार्केट-हिंदवाडी, उषा कॉलनी, शिवबसवनगर, वडगाव परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

कोरोनाचे नियम पाळत बकरी-ईद साजरी करा

Patil_p

15 दिवस झाले तरी अद्याप चौकशी अपूर्णच

Amit Kulkarni

झफरखान सरवरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

महालक्ष्मी कोविड सेंटरला अनेकांचे आर्थिक सहाय्य

Omkar B

महिनाभरात डिझेल 3 तर पेट्रोल 1 रुपयाने स्वस्त

Omkar B

वर्षभरानंतर पॅसेंजर रेल्वे येणार रुळावर

Patil_p
error: Content is protected !!