तरुण भारत

सावगाव येथे बारा जुगाऱयांना अटक

बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई, 53 हजार रुपये जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सावगाव येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकण्यात आला. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून बारा जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 53 हजार रोख रक्कम व तीन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे.

या सर्व बारा जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सावगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी बारा जुगाऱयांना अटक केली. ते सर्व जण बेळगाव शहर व तालुक्मयातील राहणारे आहेत.

संतोष तानाजी पाटील (रा. भारतनगर, शहापूर), मारुती विष्णू सुतार (रा. कलमेश्वरनगर, मजगाव), रियाज रजाक शेख (रा. कॅम्प), परशुराम सदु हळदणकर (रा. पाटील गल्ली-वडगाव), शिवाजी परशुराम लाटुकर (रा. सुळगा-हिंडलगा), रवी पांडुरंग पाटील (रा. कंग्राळी खुर्द), नजीर अजीज पठाण (रा. पाटीलमळा), प्रभाकर लक्ष्मण कारेकर (रा. शास्त्राrनगर), विजय साताप्पा कमाल (रा. हलगा-बस्तवाड), विजय श्रीनिवास नायडू (रा. गुड्सशेड रोड-शास्त्राrनगर), इक्बाल नजीरअहमद शेख (रा. लोंढा), सत्याप्पा लगमाप्पा बुड्रय़ान्नावर (रा. कंग्राळी बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या बारा जणांची नावे आहेत.

बेळगाव पोलिसांनी मटका, जुगार अड्डय़ांविरुद्ध मोहीम उघडली आहे. सोमवारी शहापूर व टिळकवाडी पोलिसांनीही सहा मटका बुकींना अटक करुन 25 हजार रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून बारा जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. शहरातील काही घरांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात जुगार सुरू आहे. तसेच ग्रामीण भागातही वाढले आहे.

अड्डे चालकांचे धाबे दणाणले

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी केलेल्या या कारवाईने मटका व जुगारी अड्डे चालकांचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाची परवानगी घेवून सोमवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली असून सावगाव येथील तलावाजवळ मोठय़ा प्रमाणात जुगार सुरू होता. सर्व बारा जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कंग्राळी बुद्रुक-गौंडवाड येथील 13 अंगणवाडय़ांना शासनाकडून साहित्य वाटप

Amit Kulkarni

पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ

Patil_p

मरगाई देवीची यात्रा साधेपणाने

Amit Kulkarni

50 जणांचा संपर्क असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक

Amit Kulkarni

जमीन टिकली तरच मनुष्य टिकेल!

Omkar B

आदित्य इंजिनियरिंग कंपनीतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वितरण

Patil_p
error: Content is protected !!