तरुण भारत

राष्ट्रीय टेबल टेनिस शिबीर पुन्हा लांबणीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बेंगळूर येथे 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारे देशातील इलाईट टेबल टेनिसपटूंसाठी राष्ट्रीय सराव शिबीर बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती भारतीय टेबलटेनिस फेडरेशनने दिली आहे.

या सराव शिबिरात दाखल होणाऱया टेबल टेनिसपटूंमध्ये प्रवास आणि शिबिराच्या ठिकाणातील सुविधावरून मतभेद झाल्याने हे शिबीर पुन्हा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकावे लागत आहे. गेल्या ऑगस्टपासून भारतीय टेबल टेनिस फेडरेशनकडून विविध टेबल टेनिसपटूंना एका छताखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात होता. सध्या शासनाकडून भारतीय टेबल टेनिस फेडरेशनला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. टेबल टेनिसपटूंचे हे शिबीर बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये 15 ऑक्टोबरपासून तीन आठवडय़ांच्या कालावधीसाठी आयोजित केले होते पण या शिबिरासाठी काही टेबल टेनिसपटू प्रवास करण्यासाठी इच्छूक आहेत तर काही जणांची विदेशात प्रशिक्षण सराव करण्याची इच्छा आहे. टेबल टेनिस सराव शिबिरासाठी बेंगळूरचे साई केंद्र अद्याप पूर्णपणे सुसज्ज करण्यात आलेले नाही. या सर्व समस्यामुळे सदर शिबीर बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आले असून ते नोव्हेंबरमध्ये घेण्याचा प्रयत्न राहील, असे टेबल टेनिस फेडरेशनचे सरचिटणीस एम पी सिंग यांनी दिर्लीं. भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू शरथ कमल या सराव शिबिरासाठी प्रवास करण्यास तयार आहे पण बऱयाच टेबल टेनिसपटूंनी बेंगळूरला प्रवास करण्यास नकार दिला आहे. भारताचा आणखी एक टेबल टेनिसपटू जी. साथीयान याला या शिबिरात सहभागी व्हावयाचे आहे पण बेंगळूरमध्ये आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला चार दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागले आहे. फ्रान्समध्ये खेळण्यासाठी भारताच्या हरमित देसाईला शासनाकडून व्हिसा मिळाला आहे.

Related Stories

एथिक्स आयोग’ बरखास्तीचा निर्णय अयोग्य : राजीव मेहता

Patil_p

पंतप्रधानांच्या कौतुकाने संघ प्रोत्साहित

Patil_p

जोकोव्हिचचे वर्षअखेरचे अग्रस्थान निश्चित

Patil_p

ज्योकोव्हिच, दिमित्रोव्ह, सेरेना तिसऱया फेरीत

Patil_p

माजी कर्णधार अहमदझाई अफगाण क्रिकेट संचालकपदी

Patil_p

सलग तिसऱया विजयासाठी एटीके सज्ज; आज ओडिशाशी सामना

Omkar B
error: Content is protected !!