तरुण भारत

मजबूत बाजारमूल्यासोबत टीसीएस दुसऱया स्थानी

रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील दिग्गज कंपन्यांमध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या मजबूत बाजारमूल्याच्या जोरावर टीसीएस दुसऱया नंबरची कंपनी बनली आहे. सोमवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱया या कंपनीचे समभाग 5.65 टक्क्मयांनी वधारुन एक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी समभागाने 52 दिवसांचा विक्रम नोंदवला आहे.

देशातील शेअर बाजारातील मजबूत कामगिरीच्या बळावर टीसीएसचे बाजारमूल्य जवळपास 10 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. कंपनीची ही कामगिरी नोंदणीय ठरलीय. कंपनीचे समभाग सत्राच्या दरम्यान 2,666.30 च्या पातळीवर होते. सदरच्या बाजारमूल्यात आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्यात तब्बल 5 लाख कोटी रुपयांचे अंतर पहावयास मिळत असल्याची नोंद केली आहे.

टीसीएसचे समभाग 11.46 वाजता बीएसईमध्ये 5.22 टक्क्मयांच्या वाढीसोबत 2,654 वर व्यवहार करत होते. तर एनएसईमध्ये कंपनीचे एकूण बाजारमूल्य 10,00,38,5.26 रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे सदरच्या कामगिरीत 15 लाख कोटींसोबत सर्वोच्च स्थानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पाठोपाठ टीसीएसचे स्थान असल्याची माहिती आहे.

Related Stories

सीईओ सलील पारेख यांच्या वेतनात 27 टक्के वाढ

Patil_p

‘ओप्पो’ची भारतात पहिली 5-जी प्रयोगशाळा

Patil_p

डिमार्टच्या महसूलात 46 टक्के वाढ

Patil_p

इंधन, ऊर्जा मागणी घटली

Amit Kulkarni

अदानी पोर्टस्चा नफा 285 टक्के वाढला

Patil_p

गोल्ड म्युच्युअल फंडकडून 13 टक्क्यांचा परतावा

Patil_p
error: Content is protected !!