तरुण भारत

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी : गृहमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सुशांत प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 

Advertisements


ते म्हणाले, सुशांत प्रकरणाआड मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. भाजपाने बदनाम करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

  • देवेंद्र फडणवीस गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का ?


पुढे ते म्हणाले, बिहार निवडणुकीमुळे सुशांत प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. मग आता देवेंद्र फडणवीस गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


तसेच सीबीआयने तपास सुरू आहे, त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर केला, तर सुशांत सिंह प्रकरणमधील तथ्य बाहेर येईल, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.

Related Stories

कोरोना : निधीसाठी भारत – पाकिस्तान मालिका खेळवा : शोएब अख्तर

prashant_c

जलशक्ती मंत्रालयतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा

Patil_p

आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

Abhijeet Shinde

होय! वानखेडेंनी माझ्याकडूनही कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या

datta jadhav

भारताचा मालदीवसोबत संरक्षण कर्ज करार

datta jadhav

पंजाबमध्ये ब्लॅक फंगसचे 100 रुग्ण; आरोग्य मंत्री म्हणाले…

Rohan_P
error: Content is protected !!