तरुण भारत

कोल्हापूर : कुंभोजची ‘अंगणवाडी क्रमांक ७६’ची सुंदर सुसज्ज, बोलकी इमारत तयार

इमारतीवरच्या बोलक्या चित्रामुळे विद्यार्थ्यांचे शाळेसाठी आकर्षण

वार्ताहर / कुंभोज

Advertisements

कुंभोज ता. हातकणंगले येथे साजनकर कॉर्नरनजीक असणारी अंगणवाडी क्रमांक ७६ ची नूतन इमारत सध्या सर्व सोयींयुक्त सुसज्ज झाली असून लॉकडाऊननंतर भरणाऱ्या शाळेसाठी ही अंगणवाडी इमारत विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. ग्रामपंचायत व शासकीय फंडातून जवळजवळ आठ लाख रुपये खर्चून सदर इमारत बांधकाम करण्यात आले असून, सदर इमारतीत विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा बोलक्या भिंती ,आकर्षक रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने रेखाटण्यात आले आहेत. परिणामी गेल्या दोन वर्षापासून सदर इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेतच होते, ते बांधकाम ग्रामपंचायत कुंभोज यांच्या पुढाकाराने सध्या पूर्ण अवस्थेत आले असून, सदर इमारत व इमारतीवर रेखाटलेली लहान मुलांना आकर्षित करणारी चित्रांची रंगरंगोटी यामुळे सदर इमारतीला भेट देणाऱ्या मुलांची संख्या वाढली असून शाळा कधी सुरू होते याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधले जात आहे.

एका बाजूला खाजगी शाळांचे प्रस्थ वाढत असताना दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांचे डागडुजी नूतनीकरण व विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुख सुविधा यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या मनात सरकारी शाळांच्या विषयाची क्रेज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

सदर इमारतीवर काढण्यात आलेले छोटा भीम मोटू पतलू चुटकी या आकर्षक बोलक्या चित्रामुळे विद्यार्थ्यांचे सदर इमारतीकडे आकर्षण वाढतच आहे. परिणामी सदर इमारतीत विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शौचालयाची कमतरता असून ती लवकरच पूर्ण केली जाईल व लवकरच शासन निर्णयानंतर सदर इमारत नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी व शाळेसाठी खुली केली जाईल असे मत ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून वक्त होत आहे.

Related Stories

करवीरमधून पहिला अर्ज दाखल; सांगवडे ग्रामपंचायतीचा पहिला अर्ज

Abhijeet Shinde

विना मास्क फिरणाऱया मनपाच्या अधीक्षकाला ५०० रूपयांचा दंड

Abhijeet Shinde

चिखलीकरांच्या मदतीमुळे माणुसकी जिवंत राहिल्याचे अधोरेखित : जिल्हाधिकारी देसाई

Abhijeet Shinde

संशोधन विकास अन् राज्यात नंबर वन विद्यापीठ

Abhijeet Shinde

प्रा .जयंत आसगावकरांनी उत्कृष्ठ कामगिरी करत शिक्षक आमदार म्हणून इतिहास घडावावा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

जुन्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जागी शाहू-आंबेडकर स्मारक उभारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!