तरुण भारत

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; मुख्यमंत्र्यांनी केली तपासणी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेने चांगलाच वेग धरला आहे. आज सकाळी वांद्रे पूर्व येथील मातोश्री निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या एच पूर्व भागातील पथकाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच परिवारातील अन्य सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली. 

Advertisements


यावेळी आरोग्य पथकाकडून सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंबलबजावणी कशी केली जाते याबाबत माहिती घेत काही सूचना देखील दिल्या. 


दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात 15 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. 

Related Stories

वास्तुशास्त्र आणि खिडकी, दरवाजे

tarunbharat

पारंपारिक बी-बियाण्यांबाबात कृषितज्ज्ञांनी दाखवलेली अनास्था चिंतनीय

prashant_c

आषाढीनंतर निर्बंधाची ‘कार्तिकी वारी’

Omkar B

गुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल

pradnya p

1 जानेवारीला भारतात सर्वाधिक मुलांचा जन्म

Patil_p

… आणि उलगडले जगसफरीचे रोमांचकारी अनुभव

prashant_c
error: Content is protected !!