तरुण भारत

सांगली : उदगिरी साखर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट एन. एस. कदम यांचे निधन

प्रतिनिधी/विटा

साखर उद्योगातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे, खानापूर तालुक्यातील पारे येथील उदगिरी शुगर्स ऍण्ड पॉवरचे व्हाईस प्रेसिडेंट एन. एस. कदम (मूळ रा. मुरगुड, जिल्हा कोल्हापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रचंड कामाची ऊर्जा आणि तितक्याच कडक स्वभावाचे उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र अशा साखरपट्ट्यात त्यांनी कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या एन. एस. कदम यांनी खानापूर सारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभा करण्याचे आणि यशस्वीपणे चालवण्याचे शिवधनुष्य पेलले. तत्कालीन मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम आणि कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. शिवाजीराव कदम यांचा विश्वास सार्थ ठरवत कारखाना प्रगतीपथावर नेण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा चांगला उपयोग करीत त्यांनी कारखान्याची अल्पावधीत प्रगती आणि भरभराट करण्यात योगदान दिले.

यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्ह्यातील नरंदे येथिल शरद सहकारी साखर कारखाना, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस अशा विविध साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली. राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम करताना एकाच वेळी इस्लामपूर, वाटेगाव, नागेवाडीचा यशवंत सहकारी आणि जतच्या राजे विजयसिंह डफळे साखर कारखाण्याचा कारभार त्यांनी पाहिला होता.

त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, मुलगा नीरज, कन्या डॉ. नुपूर असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथे होणार आहे.

Related Stories

मिरज मेडीकल कॉलेजच्या आणखी 32 विद्यार्थ्यांना कोरोना

Sumit Tambekar

सांगली : इस्लामपुरातील खुनाचा सीसीटीव्ही फुटेजवरुन छडा

Abhijeet Shinde

सांगली : आटपाडीत मुलासह आई वाहून गेली ; ओढ्यात शोधमोहीम सुरू

Abhijeet Shinde

सांगली : विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाडमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ: रात्रीत दोन दुकाने फोडली,चोरटे सीसीटीव्हीत कैद

Abhijeet Shinde

‘आयपीएल’साठी कोरोना नियम लागू होत नाही का?’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!