तरुण भारत

सीबीआयची शिवकुमार यांना नोटीस

दोन दिवसात चौकशीसाठी हजर होण्याची सूचना

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

बेहिशेबी मालमत्ता संपादनाचा आरोप असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना दोन दिवसांत चौकशीसाठी हजर होण्याची सूचना सीबीआयने दिली आहे. यासंबंधी नोटीस त्यांना मंगळवारी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे शिवकुमार गुरुवारी सकाळी सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश यांच्या 14 मालमत्तांवर सोमवारी सकाळी 60 हून अधिक सीबीआय अधिकाऱयांनी छापे टाकले होते. यावेळी 74 लाखहून अधिक रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. आता अधिक चौकशीसाठी सीबीआय अधिकाऱयांनी त्यांना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे शिवकुमार यांना बेंगळूरच्या गंगानगर येथील सीबीआय कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.

मागील पाच वर्षात डी. के. शिवकुमार यांचे उत्पन्न 33.92 कोटी रुपयांवरून 128.60 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यांनी उत्पन्नापेक्षा 44 टक्के अधिक मालमत्ता बाळगल्याचे सीबीआय अधिकाऱयांच्या निदर्शनास आले आहे.  चौकशीवेळी मालमत्तेसंबंधी योग्य माहिती देण्यात विफल ठरल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी प्राप्तिकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवकुमारांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते.

खासदार डी. के. सुरेश कोरोना पॉझिटिव्ह

सीबीआय अधिकाऱयांनी सोमवारी सकाळीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि खासदार डी. के. सुरेश या बंधुंना धक्का दिला होता. सोमवारी सायंकाळी सीबीआय अधिकारी कारवाई संपवून निघून गेल्यानंतर उभय बंधुंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जनसंपर्कात आल्यामुळे खासदार सुरेश यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता सुरेश यांची चौकशी केलेल्या सीबीआय अधिकाऱयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासदार सुरेश यांनी स्वतः याबाबत ट्वीट केले असून काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधी, सीबीआय अधिकारी व इतरांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Related Stories

बारावीचा निकाल आज

Amit Kulkarni

कर्नाटक एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Abhijeet Shinde

कर्नाटकात सोमवारी ३८ हजाराहून अधिक संक्रमितांची नोंद

Abhijeet Shinde

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच

Abhijeet Shinde

१८ ते ४४ वयोगटातील आघाडीच्या कामगारांचे लवकरात लवकर लसीकरण करा : बीबीएमपी आयुक्त

Abhijeet Shinde

कर्नाटक : कोवॅक्सिन लसीचा २.३ टक्के वापर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!