तरुण भारत

चीन, चिनी कम्युनिस्ट पार्टी हा आशियाला धोका

‘क्वॉड’च्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांची टीका

वृत्तसंस्था/ टोकियो

जपानची राजधानी टोकियो येथे मंगळवारी झालेल्या ‘क्वॉड’च्या दुसऱया बैठकीत दक्षिण चीन समुद्रापासून पूर्वेकडील लडाखपर्यंतच्या शेजाऱयांना त्रास देणाऱया चीनला घेरण्याची तयारी आकार घेताना दिसून आली. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी चीनवर जोरदार टीका केली. त्यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि चीन हा आशियासाठी धोका असल्याचे उद्गार काढले. भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त, खुला व सर्वसमावेशक करण्यास वचनबद्ध असल्याच्या विधानाशी त्यांनी सहमती दर्शविली.

चिनी कम्युनिस्ट पक्षाने ज्या धमक्मया दिलेल्या आहेत त्यांना स्वातंत्र्य आणि लोकशाही या गोष्टी सदर प्रदेशात राहणाऱया सर्व लोकांसाठी चांगल्या आहेत असे मानणाऱयांनी विरोध केला आहे. संपूर्ण जग आज चीनच्या धोक्याचा सामना करत आहे आणि अशा वेळी त्यासंबंधी गंभीरपणे विचार करून तोडगा काढला जाईल, असे पोम्पियो पुढे म्हणाले. हाँगकाँगच्या मुद्यावरूनही त्यांनी चीनवर जोरदार हल्ला केला. चिनी कम्युनिस्ट पक्षाने दिलेली वचने एका झटक्यात तोडली आहेत, अशी टीका त्यांनी केली. तैवानला दिल्या जाणाऱया दररोजच्या धमक्मयांबद्दलही पोम्पियो यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, तैवानमध्ये काय घडत आहे ते आपण पाहत आहोत. हे चीन विरुद्ध अमेरिका असे नाही, तर स्वातंत्र्य विरुद्ध अत्याचार असे आहे.

‘क्वॉड’मधील देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या बैठकीत भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर चीनच्या दादागिरीकडे लक्ष वेधताना म्हणाले की, इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त, खुला व सर्वसमावेशक करण्यास भारत वचनबद्ध आहे. नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमा, पारदर्शकता, कायद्यानुसार शासन, दळवळणाचे स्वातंत्र्य, प्रादेशिक एकतेचा आदर, सार्वभौमत्व आणि विवादांचे शांततापूर्णरीत्या निराकरण यास भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये समन्वयावरही त्यांनी भर दिला. यावेळी चीनचे नाव न घेता जयशंकर यांनी मुक्त-खुल्या इंडो-पॅसिफिक प्रदेशची आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी केली.

Related Stories

बहरीनमध्ये बुरखाधारी महिलेकडून गणेशमूर्तींची तोडफोड

datta jadhav

पाकमध्ये हिंदू शिक्षिकेचे जबरदस्तीने धर्मांतर

datta jadhav

मेक्सिकोमध्ये 11, 653 नवे कोरोना रुग्ण ; 816 मृत्यू

pradnya p

नेपाळ नरमला, भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटविली

Patil_p

हिंदी महासागरात प्रचंड इंधनगळतीचा धोका

Patil_p

चीनमधील अमेरिकन उद्योग इंडोनेशियाच्या वाटेवर

datta jadhav
error: Content is protected !!