तरुण भारत

खादी आउटलेटमधून 1.2 कोटींची कमाई

गांधी जयंतीदिनी विशेष नियोजन: खादी उत्पादनांना चालना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्वसामान्यांना भुरळ पाडणाऱया खादीच्या विक्रीने कोरोनाच्या छायेतही समाधानकारक कामगिरीची नोंद केली आहे. यामध्ये मागील वर्षाप्रमाणे चालू वर्षातही दिल्लीच्या कॅनोट प्लेस (सीपी) मध्ये सद्यस्थितीत खादी इंडिया आउटलेटमधील विक्री ही 1 कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचली असल्याची नोंद केली आहे.

दोन ऑक्टोबर रोजी सदर आउटलेटमधून एकूण विक्री 1,02,19,496 रुपयांची झाली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम एंटरप्राईजेस (एमएसएमई) मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या दरम्यान ही विक्री नेंदणीय ठरली असल्याची नोंद केली असून मागील वर्षात दोन ऑक्टोबरला खादीच्या सीपी आउटलेटमधील उत्पादनांची विक्री 1.27 कोटींवर राहिली होती.

खादीवर विशेष सवलत

महात्मा गांधींच्या 151 व्या जयंतीनिमित्ताने खादी ग्रामोद्योग आयोगाने (केवीआयसी) एकूण प्रत्येक वर्षाला उत्पादनांवर 20 टक्क्मयांची सवलत ग्राहकांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

खादी उत्पादनास चालना

खादी उत्पादनांना देशात चालना देण्यासाठी मागील काही वर्षापासून केंद्रा कडून प्रयत्न केले जात होते. सदर उत्पादनांचे विविध स्टॉल्स उभारून देशभरात खादी लोकप्रिय करण्यावर खादी आयोगाने प्रयत्न केला आहे

Related Stories

जीओनीची स्मार्टवॉचेस बाजारात

Patil_p

चेन्नईत हय़ुंडाईचे उत्पादन सुरु

Patil_p

इंडिया फर्स्टमधील हिस्सेदारी युनियन बँक कमी करणार

Patil_p

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स भारी

Patil_p

सॅमसंगचे 10 लाख एलइडी टीव्ही विक्रीचे उद्दिष्ट

Omkar B

संदीप सिक्कांची सीईओपदी पुनर्नियुक्ती

Patil_p
error: Content is protected !!