तरुण भारत

ड्रग्ज प्रकरण : रीया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर

  • भाऊ शौविकला अजूनही राहावे लागणार जेलमध्ये

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेली अभिनेत्री रीया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. रीयाने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी रीयाला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

Advertisements


रीयाला सुटकेनंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. रीयाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून भारताबाहेर परवानगीशिवाय प्रवास करण्यास मनाई आहे. मुंबईच्या बाहेर जाताना तपासी यंत्रणेला सूचना देणे बंधनकारक आहे. 


रीयाला या प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी, अब्दुल परिहार आणि शौविक या दोघांचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तर  सॅम्युअल मिरांडा  आणि दीपेश सावंत यांना ही जामीन मंजूर करण्यात आला आहे. या दोघांकडून  50 हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या आदेशाविरोधात अपिल करता यावे यासाठी एक आठवड्याची स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र, रीयाला जामीन मंजूर करताना आधीच अनेक कठोर अटी लावलेल्या आहेत त्यामुळे विनंती मान्य करणार नाही, असे स्पष्ट करून एनसीबीची विनंती न्यायमूर्तींनी फेटाळली.

Related Stories

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

कर्नाटकात कोरोनाचा नवा विक्रम

Shankar_P

कोरोनाची धास्ती : पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला; दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत

triratna

तेलंगणा : सफाई कर्मचाऱ्याकडून दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

prashant_c

देशाचे वैभव वाढविणे, हेच ‘आत्मनिर्भर’तेचे उद्दिष्टय़

Amit Kulkarni
error: Content is protected !!