मुंबई
भारतात आपला व्यवसाय करणाऱया बीएमडब्ल्यू ग्रुपकडून मोटारींच्या किंमतीत वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दर वाढ 1 नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहे.
चलन दरात आलेली घट आणि वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी कंपनीला कार्सच्या किंमती वाढवणे अपरिहार्य ठरते आहे. 1 नोव्हेंबरपासून कंपनीच्या कार्स 3 टक्के इतक्या महाग होणार
आहेत.
बीएमडब्ल्यू गुपचे मुख्य कार्यालय गुरूग्राम येथे असून 5.2 अब्ज इतकी भारतात कंपनीने गुंतवणूक केली आहे.