तरुण भारत

हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

ऑनलाईन टीम / पुणे :

हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

Advertisements


शासनाच्या आदेशान्वये 50 टक्के क्षमतेनुसार हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टाँरट व बार हे 5 ऑक्टोबर पासून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात हॉटेल, रेस्टॉरंट या आस्थापना चालू करण्यास दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत. महाराष्ट्र शासन व पर्यटन विभाग यांनी ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या सूचनेनुसार विशेषत: हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांच्याकडून या आदेशाची योग्य रितीने अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी साथ नियंत्रण कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदींनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुढील प्रमाणे विहित मानक कार्यप्रणाली निर्गमित केली आहे.


पुणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे 5 ऑक्टोबर 2020 पासून 50 टक्के क्षमतेनुसार सूरु राहतील. या करीता पर्यंटन विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक आहे. पुणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे दि. 5 ऑक्टोबर पासून 50 टक्के क्षमतेनूसार सूरु राहतील. हॉटेलमध्ये येणा-या सर्व ग्राहकांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनिंग द्वारे तपासणी करण्यात यावी. तसेच आरोग्य सेतू ॲप, डाऊनलोड व अपडेटेड असणे आवश्यक आहे. कोविड-19 संदर्भात लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. आस्थापनांनी सेवा देताना किंवा प्रतिक्षालय येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करावे. ग्राहकांनी मास्क परिधान केले असेल तरच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांनी हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात असताना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.

आस्थापना चालकांनी ग्राहकांना शक्यतो डिजीटल माध्यमाद्वारे पेमेंट करण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख स्वरुपात पेमेंट घेताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आस्थापनेच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असावी. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे. सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू प डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी.

ऑनलाईन आउटलेट असणाऱ्या आस्थापनांनी आस्थापना सुरु असण्याच्या वेळा, मास्कचा वापर, खादय पदार्थांची आगाऊ बुकिंग, आगाऊ पेमेंट, डिलिवरी इ.बाबत असणारे नियम,पॉलिसी यांची माहिती वेबसाईट, सोशल मिडिया इ. माध्यमातून प्रसिध्द करावी. सर्व संबंधीत आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोविड-19 चाचणी करावी. एन-95 किंवा त्याच दर्जाचा मास्क कर्मचाऱ्यांनी वापरणे अनिवार्य आहे.

आस्थापनांनी एचएसीसीपी, आयएसओ, एफएसएसएआय यांचे स्वच्छता बाबतचे निकष व मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पणे पालन करावे, असे ही त्यांनी सांगितले.

Related Stories

पुणे : सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर

pradnya p

शेतकऱ्यांचा आवाज दाबू नका : हनुमंत पवार

pradnya p

अजित पवारांकडून पोलीस मुख्यालयाची पाहणी, कामाच्या दर्जावरून ठेकेदाराची कानउघडणी

pradnya p

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात 30 टक्के पदे रिक्त

Shankar_P

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

triratna

सोलापुरात नव्याने आढळले 6 कोरोनाबाधीत रूग्ण

triratna
error: Content is protected !!