तरुण भारत

क्विटोव्हा-केनिन, नदाल-श्वार्ट्झमन उपांत्य फेरीत

प्रेंच ग्रँडस्लॅम : डॉमिनिक थिएम स्पर्धेबाहेर, यानिक सिनर, सीगमंड यांचाही पराभव

वृत्तसंस्था / पॅरिस

Advertisements

झेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाने आठ वर्षांच्या खंडानंतर प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे तर स्पेनच्या राफेल नदालने इटलीचा उदयोन्मुख टेनिसपटू यानिक सिनरला कडवी लढत देत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. याशिवाय अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमला संघर्षपूर्ण लढतीत पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली आणि अमेरिकेच्या केनिननेही पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.

क्विटोव्हाने जर्मनीच्या लॉरा सीगमंडचा 6-3, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. क्विटोव्हाने विम्बल्डन स्पर्धा दोनदा जिंकली असून तिची उपांत्य लढत सोफिया केनिनशी होईल. ‘या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणे ही माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे,’ असे 30 वर्षीय क्विटोव्हा सामन्यानंतर म्हणाली. 2012 मध्येही तिने उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यावेळी विजेत्या ठरलेल्या मारिया शरापोव्हाने तिला पराभूत केले होते. डिसेंबर 2016 मध्ये तिच्यावर घरी असताना चाकूहल्ला झाला होता. सहा महिन्यानंतर तिने 2017 मध्ये याच स्पर्धेतून पुनरागमन केले होते.

गुरुवारी पोलंडची 19 वर्षीय इगा स्वायटेक व अर्जेन्टिनाची नादिया पोडोरोस्का यांच्यात दुसरी उपांत्य लढत होणार आहे. पोडोरोस्का ही पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविल्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला होण्याचा बहुमान मिळविण्याचा प्रयत्न या लढतीत करणार आहे. अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित अमेरिकेच्या सोफिया केनिनने पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना आपल्याच देशाच्या कॉलिन्सचा 6-4, 4-6, 6-0 असा पराभव केला. केनिन ही या वर्षीची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेची विजेती आहे.

क्लेकोर्ट मास्टर असलेल्या नदालची उपांत्यपूर्व फेरीत सिनरकडून बऱयापैकी कसोटी झाली. या स्पर्धेत 13 वे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आगेकूच करणाऱया नदालने सिनरचा 7-6 (7-4), 6-4, 6-1 असा पराभव केला. त्याची उपांत्य लढत अर्जेन्टिनाच्या श्वार्ट्झमनशी होणार आहे. श्वार्ट्झमनने संभाव्य विजेत्यापैकी एक मानल्या जाणाऱया थिएमचे आव्हान पाच सेट्सच्या झुंजार लढतीत मोडून काढत शेवटच्या चारमध्ये प्रथमच स्थान मिळविले. तब्बल पाच तास रंगलेल्या या झुंजीत श्वार्ट्झमनने 7-6 (7-1), 5-7, 6-7 (6-8), 7-6 (7-5), 6-2 असा विजय मिळविला. श्वार्ट्झमनने यापूर्वी टॉप पाचमधील एकाही खेळाडूला ग्रँडस्लॅम स्पर्धेत हरविले नव्हते. याआधी येथील स्पर्धेसह तीन ग्रँडस्लॅममध्ये तो उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता. जेतेपदाच्या समीप पोहोचण्यासाठी उपांत्य फेरीत नदालविरुद्ध त्याला अशीच कामगिरी करावी लागणार आहे.

Related Stories

रोहित शर्माला वगळल्याचे गूढ!

Patil_p

ब्राझील, कोलंबिया संघांचे विजय

Patil_p

डब्ल्यूव्ही रमण यांची बीसीसीआयकडे तक्रार

Patil_p

हॉकी संघाचे प्रमुख ध्येय ऑलिम्पिक पदक असावे- भास्करन

Patil_p

आयपीएल कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक

Patil_p

पॅट कमिन्सचे प्रमुख लक्ष चेतेश्वर पुजारा

Patil_p
error: Content is protected !!