तरुण भारत

दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनास प्रारंभ

बेळगाव : कोरोनास्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शिक्षकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनासाठी परीक्षकांना बेळगाव जिल्हय़ातच व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारपासून दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनाला प्रारंभ झाला
आहे.

एकूण 6 केंद्रांवर 424 शिक्षक मूल्यामापनाचे काम करत आहेत. कोविड-19 चा धोका ओळखून प्रत्येक केद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेण्यात येत आहे. माध्यमनिहाय पेपर तपासणीच्या संख्येनुसार मूल्यमापन प्रक्रिया आठवडाभरात पार पडणार आहे.

Advertisements

 लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या एसएसएलसी परीक्षेमुळे यंदा अनुत्तीर्णांची संख्या अधिक होती. यामुळे पुरवणी परीक्षेच्या पेपरची संख्या देखील जास्त आहे. परिणामी नियुक्त केलेल्या शिक्षकांकडून नियोजित वेळेनुसार मूल्यमापनाचे काम सुरू करण्यात आले आहे. विद्यागम अंतर्गत विद्यार्थ्यांना धडे गिरवणारे शिक्षक मूल्यमापनाच्या कामात व्यस्त असल्याने सदर योजनेला बेक लागला आहे.

 सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स, उषाताई गोगटे, महांतेशनगर कन्नड हायस्कूल, सिद्धरामेश्वर हायस्कूल, मराठा मंडळ या केंद्रांवर मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यानुसार थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर्सचा वापर, मास्कची सक्ती आणि परस्परातील सामाजिक अंतर याचे भान बाळगून मूल्यमापकांकडून पेपर तपासणीचे कार्य केले जात आहे. माध्यमनिहाय पेपर तपासणीच्या संख्येनुसार मूल्यमापन प्रक्रिया आठवडाभरात पार पडणार आहे.

Related Stories

कोगनोळी नाक्यावर धडक मोर्चा

Omkar B

आधार नोंदणीसाठी बेळगावकरांना पोस्टाचा आधार

Patil_p

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची वार्षिकसभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

बागलकोट जिल्हय़ात 20 कोरोनाबाधित

Patil_p

राष्ट्रपुरुषांच्या अवमानामागे सुनियोजित षड्यंत्र?

Patil_p

‘ग्राहक’ महत्त्वाचा हे भान कायम हवे

Omkar B
error: Content is protected !!