तरुण भारत

कोल्हापूर : स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा – माजी आमदार अमल महाडिक


कुंभोज / वार्ताहर
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. परिणामी त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना अंंमलात आणल्यास कोरोनापासून नक्कीच मोठ्याप्रमाणात बचाव होऊ शकतो.
परिणामी काही नागरिक कोरोणा नसल्याचा दावा करत आहेत परिणामी कोरोना सारखा महाभयंकर आजारापासून होणारे परिणाम मी स्वतः सोसले असून मी व माझ्या परिवार सर्वसामान्यांच्या जनतेच्या आशीर्वादामुळे आज कोरोनापासून बरा होऊन घरी परतला आहे .सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना आजाराला किरकोळ न समजता त्यांच्यापासून बचावासाठी लागेल ते प्रयत्न करावेत असे उद्गार माजी आमदार अमल महाडिक यांनी काढले.
ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हातकणंगले उपविभागीय अधिकारी पांडुरंग शेंडगे यांच्या श्रद्धांजली भेटीदरम्यान बोलत होते पुढे ते म्हणाले की कै पांडुरंग शेंडगे यांच्या माध्यमातून महाडिक गटाचा वाघ हरपला परिणामी त्यांची उणीव सतत महाडिक गटाला भासत राहील, आज कोरोणा सारख्या महाभयंकर रोगाने देव मानव आरोग्य सर्व यंत्रणेला हातलब केले असून सध्या विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा कोरोनाउपयोजनेसाठी कोणाला आवश्यकता असल्यास महाडिक कुटुंबीय सदैव तयार असेल त्यासाठी कधीही संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
यावेळी त्यांच्या समवेत छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील, संचालक बिरदेव तांनगे ,अमित साजनकर, विनायक पाटील ,अशोक चौगुले पावलस कांबळे दीपक कांबळे ,ओमकार वाईकर तसेच महाडिक गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

मोरेवाडी येथे उपसरपंच पदाचा खेळखंडोबा

Sumit Tambekar

कोल्हापूर : रुईत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

Abhijeet Shinde

गोकुळसाठी माजी आ.सत्यजीत पाटील यांनी विरोधकांसोबत राहू नये

Abhijeet Shinde

साहेब…, आम्ही शेतकरी आहोत!

Abhijeet Shinde

कोरोना नियम तोडणाऱ्या 1961 जणांना दणका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!