तरुण भारत

एनसीसीतील कामगिरीबद्दल विराज कुलकर्णी याचा गौरव

बेळगाव  : येथील सेंट पॉल्स शाळेचा विद्यार्थी विराज कुलकर्णी याला एनसीसीतील कामगिरीबद्दल कर्नाटक चिफ मिनिस्टर कमेंडेशन कार्ड अँड मेडलने गौरविण्यात आले.   विराज हा 8 कर्नाटक एअर स्क्वाड्रनचा एनसीसी छात्र असून कर्नाटक आणि गोवा संचालनालयामध्ये उत्कृष्ट एनसीसी छात्र म्हणून त्यांने प्रथम क्रमांक तर राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला आहे. याबद्दल गेल्या प्रजासत्ताक दिनी कांस्यपदक देऊन त्याला गौरविण्यात आले होते. गोवा व कर्नाटक विभागात झालेल्या स्पर्धांमध्ये विराजने समूह गायन, समूह नृत्य व लेखी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. एनसीसीतील त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन त्याला नुकतेच मुख्यमंत्री गौरवपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

   विराज हा शाळेचा स्कूल लीडर असून त्याला तबला, गायन, वादन आणि क्रिकेट खेळाची आवड आहे. भविष्यात हवाईदलात फायटर पायलट होण्याचा त्याचा मानस आहे. शेरी गल्ली येथील प्रति÷ित नागरिक ज्योती आणि मनोज कुलकर्णी यांचा तो चिरंजीव असून एअर फोर्स आणि युनियन बँकेचे निवृत्त कर्मचारी अप्पाजी कुलकर्णी व पुष्पा कुलकर्णी यांचा तो नातू आहे. त्याला विंग कमांडर पी. आर. पोनाप्पा यांचे मार्गदर्शन लाभले. कर्नल आदित्य वर्मा यांच्या हस्ते नुकतेच त्याला प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले.

Advertisements

Related Stories

फोटोग्राफरला मारहाण करून लुटले

Patil_p

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलतर्फे योग शिबिराचे आयोजन

Patil_p

विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू

Amit Kulkarni

बेळगावला रेमडेसिवीरचा पुरवठा सुरू

Amit Kulkarni

प्रांताधिकाऱयांकडून अनमोड मार्गाची पाहणी

Omkar B

हिंडलग्यात मासिक बैठक घेण्यास सदस्यांचा विरोध

Omkar B
error: Content is protected !!