तरुण भारत

हज यात्रेच्या फॉर्ममधील इन्कम टॅक्स रिटर्नची अट रद्द करा : जहांगीर हजरत

वार्ताहर / कुंभोज

मुस्लिम धर्मीयांचा पवित्र हज यात्रेसाठी फॉर्म भरताना इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक राहणार ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी कुंभोज ग्रामपंचायतीचे उपसरपंच जहांगीर हजरत यांच्यावतीने शासन दरबारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisements

राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व हज कमिटी अध्यक्ष आणि कार्यकारी मुख्य अधिकारी यांनाही निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पवित्र हज यात्रेसाठी काही मुस्लिम बांधव वर्षानुवर्षे रक्कम जमा करतात, पूर्ण रक्कम जमा झाल्यावर पवित्र हज यात्रेसाठी फॉर्म भरतात तसेच काही मुस्लीम बांधव अनेक गरीबांना हज यात्रेसाठी पाठवतात, वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून सदर गोष्टींवर लावण्यात आलेले आयटी रिटर्नची जाचक अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी कुंभोज उपसरपंच व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी जहांगीर हझरत यांच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर : शियेतील ‘त्या’ सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

गगनगड रस्त्यावरील मोरीचे काम सुरू

Abhijeet Shinde

सचिन वाझेविरोधात एसीबीकडे दोन तक्रारी

Abhijeet Shinde

आता अकरावी प्रवेश प्रक्रिया करता येणार घरबसल्या

Abhijeet Shinde

सरुड परिसरात बिबट्याचा दुसऱ्यांदा कुत्र्यावर हल्ला

Abhijeet Shinde

गोडाऊनमध्ये ग्लास अंगावर पडून मालवाहू रिक्षा चालकाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!