तरुण भारत

पाणीपट्टी न भरल्यास नळ जोडणी बंद करण्याचा इशारा

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डने घरपट्टी भरण्यासाठी मालमत्ताधारकांना नोटीस बजावली होती. त्या पाठोपाठ आता पाणीपट्टी भरण्यासाठी सूचना जारी केली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत पाणीपट्टी जमा न केल्यास नळ जोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवासियांना ऑक्टोबर अखेरपर्यंत पाणीपट्टी भरावी लागणार आहे.

Advertisements

कोरोना विषाणूंचा प्रसार वाढल्याने शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी घरपट्टी व पाणीपट्टी जमा केली नाही. घरपट्टी भरण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने ऑगस्ट महिन्यात नोटीस बजावली होती. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाचा प्रसार वाढल्याने घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशा स्थितीतही घरपट्टी भरण्याची सूचना करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या पाठोपाठ आता पाणीपट्टी भरण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने तगादा लावला आहे. ज्या नळधारकांनी पाणीपट्टी जमा केली नाही त्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत पाणीपट्टी भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. पाणीपट्टी जमा न केल्यास नळ जोडणी बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी 20 दिवसांच्या आत पाणीपट्टी भरावी लागणार आहे. 

Related Stories

सात सफाई कर्मचारी कुटुंबांना हक्कपत्रांचे वितरण

Amit Kulkarni

रविवारपेठेत शुक्रवारी खरेदीसाठी तोबा गर्दी

Patil_p

सुळगा (हिं) सिमेदेव मैदानाची पीडिओंनी तातडीने केली पाहणी

Patil_p

अलोककुमार यांनी केली पोलिसांच्या आरोग्याची विचारपूस

Patil_p

राज्यातील 43 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Patil_p

सकाळच्या सत्रातील बेंगळूर विमानसेवा पूर्ववत करा

Patil_p
error: Content is protected !!