तरुण भारत

गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजपासून महालिलाव

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेला महसूल मिळवून देणाऱया व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी असलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शुक्रवार दि. 9 पासून लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. फिश मार्केट येथील 20 गाळय़ांचा लिलाव शुक्रवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत  महापालिका मुख्य कार्यालयात होणार आहे.

Advertisements

महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. कसाई गल्ली येथील फिश मार्केटही भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पण सदर गाळय़ांची मुदत संपुष्टात आली आहे. त्याचप्रमाणे इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याने भाडय़ाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या फिश मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शुक्रवार दि. 9 रोजी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. एकाच इमारतीमध्ये 20 गाळे निर्माण करण्यात आले असून, सध्या या गाळय़ांचा वापर येथील व्यापारी करीत आहेत. मात्र लिलावाच्या पार्श्वभूमीवर गाळय़ांचा ताबा घेण्यात आला आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 50 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. एका गाळय़ासाठी प्रतिमहिना 3 हजार रुपये भाडे महापालिकेच्यावतीने ठरविण्यात आले आहे. सदर गाळे 12 वर्षांच्या भाडे कराराने देण्यात येणार आहेत. 20 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शुक्रवारी बोली लागणार आहे. 3 हजार रुपये मूळ भाडे असणार असून त्यावर बोली लागणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेणाऱया नागरिकांना 50 हजार रुपयांचा डीडी बोलीपूर्वी जमा करावा लागणार आहे. लिलावाकरिता नियमावलींची पूर्तता केल्यानंतरच लिलाव प्रक्रियेत बोली लावता येणार आहे. मागील 3 वर्षांपासून महापालिकेला भाडे मिळाले नाही. मात्र, यापुढे फिशमार्केटच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळावा हा उद्देश महापालिका प्रशासनाचा आहे. महापालिकेने ठरविलेल्या भाडय़ाच्या रकमेनुसार वर्षाला 7 लाखांहून अधिक महसूल मिळण्याची शक्मयता आहे.   

Related Stories

प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च ध्येय ठेवले पाहिजे

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात सोमवारी 266 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Rohan_P

शहापूर गटारींच्या खोदाईमुळे नागरिकांना त्रास

Patil_p

भात पीक पोसवणीच्या मार्गावर असतानाच पावसाची रिपरिप सुरुच

Patil_p

कंग्राळी खुर्द येथील विवाहिता बेपत्ता

Patil_p

बेकायदेशीररित्या कासवांची विक्री करणाऱयाला अटक

Patil_p
error: Content is protected !!