तरुण भारत

सर्किट हाऊस-जुने भाजीमार्केट रस्त्यावर वाहतूक कोंडी

बेळगाव  / प्रतिनिधी

शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतूक क्यवस्था विस्कळीत झाली आहे. शहरात वाहनधारकांना अनेक ठिकाणी होणाऱया वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सर्किट हाऊस ते जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱया रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. कित्येक वेळा ही बाब निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisements

  अनलॉक-5 नुसार शहरातील बाजारपेठ व बससेवा हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. शहरातील दररोज गजबजणाऱया प्रमुख रस्त्यांचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. शहरात प्रवेश करणाऱया बसस्थानक रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने सर्किट हाऊस ते जुन्या भाजी मार्केट रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

 शहरात येणाऱया वाहनांची व बसस्थानकात येणाऱया बसेसची संख्या अधिक असल्याने बसस्थानकाच्या प्रवेशद्वारजवळ वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्याबरोबर प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी रिक्षा थांबत असल्याने व प्रवाशांची वर्दळ वाढून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे इतर मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

बेळगावची कन्या राज्यस्तरीय ‘मिस इंडिया’च्या अंतिम फेरीत

Omkar B

मतिमंद मुलाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार

Amit Kulkarni

काळय़ा फिती बांधून विद्युत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Patil_p

मराठा मंदिरमधील गार्मेंट सेलचा आज शेवटचा दिवस

Amit Kulkarni

माणसांच्या चांगुलपणावरील विश्वासापोटीच यशस्वी

Amit Kulkarni

मुतगा येथे अंगणवाडी बांधकामाला चालना

Amit Kulkarni
error: Content is protected !!