तरुण भारत

भवानीपूरकडून बेंगळूर युनायटेड पराभूत

वृत्तसंस्था/ कोलकाता

कोरोना महामारीमुळे तब्बल सात महिन्यांच्या कालावधीनंतर कोलकाता येथे पुन्हा क्रीडा हालचालेंना प्रारंभ झाला. गुरूवारी येथे झालेल्या आय लीग पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भवानीपूर एफसीने बेंगळूर युनायटेड एफसीचा 2-0 अशा गोल फरकाने पराभव केला.

Advertisements

येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या प्रारंभी कोरोना संदर्भातील सर्व नियमावलींची अंमलबजावणी केली होती. सॅनीटेशन, फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक वर्गातील सदस्यांची वैद्यकीय चांचणी, सामना सुरू होण्यापूर्वी करताना प्रत्येक व्यक्तींचे तापमान पाहण्यात आले. सामन्यावेळी सोशल डिस्टन्सची पाळणूक करण्यात आली होती. या ठिकाणी 14 मार्च रोजी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर कोरोनामुळे सर्व क्रीडास्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या.

पाच संघांचा सहभाग असलेल्या या राऊंड रॉबिन आय लीग पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील गुरूवारच्या सामन्यात भवानीपूर एफसीने सुरूवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर भर दिल्याने बेंगळूर एफसी संघाला दडपण आल्याचे जाणवले. या स्पर्धेतील विजेता संघ डिसेंबर महिन्यात होणाऱया आय लीग फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविणार आहे. या सामन्यावेळी स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती नव्हती. या सामन्यात 21 व्या मिनिटाला बेंगळूर युनायटेड संघाने गोल करण्याची सेपी संधी गमावली. मध्यंतराला केवळ एक मिनिट बाकी असताना भवानीपूर एफसी संघाचे खाते पंकज मौलाने उघडले. घानाचा खेळाडू फिलीप अदेजने दिलेल्या पासवर मौलाने हा गोल नोंदविला. खेळाच्या पूर्वार्धात बेंगळूर एफसीने आक्रमक चाली केल्या पण त्यांना भवानीपूर एफसीच्या बचावफळीला भेदता आले नाही. 60 व्या मिनिटाला भवानीपूर एफसीचा दुसरा गोल घानाचा खेळाडू अल्तमस सय्यदने नोंदवून बेंगळूर युनायटेडचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

विजयाच्या ट्रकवर परतण्याचे कांगारुंचे लक्ष्य

Patil_p

महिलांच्या आशियाई चषक फुटबॉलसाठी पाच देश पात्र

Patil_p

राफाएल बर्गामास्को भारतात येण्यास सज्ज

Patil_p

लाज राखली, व्हॉईटवॉश टळला!

Omkar B

रशियाच्या दोन जलतरणपटूंवर कारवाई

Amit Kulkarni

दीपिका कुमारी-अतानू दासची सर्वोत्तम कामगिरी

Patil_p
error: Content is protected !!