तरुण भारत

रत्नागिरी : तुतारी एक्स्प्रेस मडगावपर्यंत नेण्यास कोकण रेल्वे समन्वय समितीचा विरोध

प्रतिनिधी/खेड

कोकणातील प्रवाशांसाठी २६ सप्टेंबरपासून चालवण्यात येणाऱ्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या कोरोना विशेष गाडीला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी ही एक्सप्रेस मडगावपर्यंत नेण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. कोकण रेल्वे समन्वय समितीने या मार्ग विस्ताराला विरोध दर्शवत हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना दिले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना २२ मार्चपासून ब्रेक लागला. यामुळे कोकणातील प्रवाशांची गैरसोय होत होती. कोकण मार्गावर रेल्वेगाड्या सुरू करण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार कोकण मार्गावर २६ सप्टेंबरपासून दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस चालवण्यात येत असून लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम, हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्सप्रेसही धावत आहे. यातील तृतारी एक्सप्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याची सबब पुढे करत तुतारी मडगावपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसा प्रस्तावही कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. कोरोना काळात तुतारीच्या डब्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियम पालनही पुरेशी प्रवाशांची संख्या आहे. कोरोना विशेष गाडी घोषित काताना सामान्य हवे करून त्याठिकाणी वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. वातानुकूलित डब्यांना प्रतिसाद मिळत नसला तरी उर्वरित डब्यांतील प्रवाशी संख्या क्षमतेच्या ८० ते ९५ टक्के आहे.

Advertisements

Related Stories

महिला बाल रुग्णालय काम पूर्णत्वासाठी हालचाली

NIKHIL_N

संगमेश्वर, लांजा, दापोलीत जोरदार पाऊस

Patil_p

नाटे पोलिसांकडून शिकारी टोळके जेरबंद

Patil_p

सावंतवाडी सबनीसवाडा येथे विवाहितेची आत्महत्या

Ganeshprasad Gogate

पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

NIKHIL_N

कावळे मरण्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!