तरुण भारत

युवा काँग्रेसतर्फे बिल्डकाँम कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी/ पणजी

 आग्शी परीसरातील रस्त्याची दुर्दशा झालेल्या रस्त्याचे बांधकाम करणाऱया बिल्डकॉम कंपनीच्या कार्यालयावर युवा काँग्रेस तर्फे मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी कंपनीने रस्ता व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते न पाळल्याने युवा काँग्रेसने एकाचा आठवडय़ात दुसऱय़ांदा मोर्चा नेऊन रस्त्याचे काम कधी करणार ते लेखी देण्याची मागणी केली होती.

काँग्रेस प्रदेश समिती उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, अर्चीत नाईक, विवेक डिसील्वा, टोनी फर्नांडिस, साईश आरोस्कर, सुकुरीन गोन्साल्वीस, ग्लेन काब्राल, सुदीन नाईक, हमान्शू तिवरेकर.

युवा काँग्रेस तसेच इतर पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते. प्रकरणा हाताबाहेर जाण्याची स्थिती दिसू लागल्याने मोठय़ा प्रमामात पोलीस फाटाही मागविण्यात आला होता. आल्ड गोवा निरीक्षक सिनारी व  त्यांची टीम तसेच आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे व त्यांची टीम घटनास्थळी हजर होते. अखेर कंपनीच्या अधिकाऱयांनी लवकरच रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा आटोपता घेण्यात आला. तसचे दिलेल्या वेळेत रस्त्याचे काम न झाल्यास पुन्हा मोर्चा आणण्याचा इशाराही युवा काँग्रेसने दिला आहे.

Related Stories

महिला पोलिसाने राय येथे पद्यातून केली जनजागृती

Omkar B

वनखात्यानेच लावली हुळर्ण डोंगराला आग

Omkar B

बेकायदा गाडय़ावर कारवाईकडे मडगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष

Patil_p

कोरोनामुळे बडय़ा मंदिरांचे लाखोंचे नुकसान

Omkar B

खोर्ली येथे शॉक लागून युवक ठार

Omkar B

डिचोलीत बुधवारी 31 उमेदवारी अर्ज सादर

Amit Kulkarni
error: Content is protected !!