तरुण भारत

सिमाभागातील विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारी पासून शैक्षणिक संकुल

50 हजार ऑनलाईन तर 13 हजार विद्यार्थी देणार ऑफलाईन परिक्षा

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

सिमाभागातील विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारी पासून शैक्षणिक संकुल सुरु करण्यात येणार आहे. या शैक्षणिक संकुलासाठी शिनोळी (ता.चंदगड) येथे तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर जागा निश्चीत करण्यात आली आहे. 1 जानेवारी पासून या शैक्षणिक संकुलामध्ये अभ्यासक्रम सुरु केले जातील अशी माहिती शुक्रवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी जिल्हा दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, सिमाभागातील विद्यार्थ्यांसाठी भव्य शैक्षणिक संकुल उभा करण्यात येणार आहे. यासाठी तुडये (ता. चंदगड) येथे 10 एकर जागेची निश्चीती करण्यात आली आहे. मात्र 1 जानेवारी पासून शिनोळी (ता. चंदगड) येथे नवीन शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. एका खासगी संस्थेची जागा भाडे तत्वावर घेण्यात येणार असून परिसरातील महाविद्यालयांशी चर्चा करुन या शैक्षणिक संकुलातील अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रासाठी 17 ऑक्टोंबर पासून परीक्षा घेण्यात येणार आहेत. 3 जिह्यातील 293 सेंटरवर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना सराव प्रश्न उपलब्ध होणार असून यानंतर मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्याच्या सुचना केल्या असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. तसेच एटीकेटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा 120 दिवसानंतर घेण्याच्या सुचना आहेत. मात्र आता त्या तात्काळ घेण्यात येणार आहेत. रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा प्रश्नही मार्गे लागला असून टप्प्याटप्प्याने ही भरती करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. 
 मुंबई, सोलापूर प्रमाणे तांत्रिक अडचणी नको 

 मुंबई, सोलापूर, गोंडवणा विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या त्रुटी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा घेताना येवू नयेत यासाठी सर्व खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांसाठी 9 हजार विद्यार्थी असताना 5 लाख जणांनी परीक्षेची वेबसाईट ओपन केली. हा सायबर हल्ला असून चेन्नई येथील संबंधीत कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

        50 हजार विद्यार्थी देणार ऑनलाईन परीक्षा 

एकूण विद्यार्थी संख्या ः 74 हजार 17
ऑनलाईन परिक्षा देणारे विद्यार्थी ः 50 हजार 417
ऑनलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी ः 13 हजार
अद्याप नोंदणी न केलेले विद्यार्थी ः 10 हजार 600
ऑफलाईनसाठी 3 जिह्यातील परिक्षा सेंटर ः 293

मुले ः 34 हजार 499
मुली ः 39 हजार 419
दिव्यांग ः 200

Related Stories

कोल्हापुरात कोरोना केअर सेंटरचे `सॅनिटायझेशन’ सुरू

Abhijeet Shinde

सर्वांसाठीची ‘महात्मा फुले’ योजना ३१ डिसेंबरपर्यंत

Abhijeet Shinde

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी तेजस्विनी शिंदे

Abhijeet Shinde

ब्राह्मण समाज आर्थिक विकास महामंडळासाठी राज्य सरकारला निर्देश देवू

Abhijeet Shinde

इचलकरंजीत कोरोनाचे नवे 13 रुग्ण

Abhijeet Shinde

गांधीनगरमध्ये ३५ हजारांचा गुटखा जप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!