तरुण भारत

रत्नागिरी (संगमेश्वर) : कळंबस्ते येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी / संगमेश्वर

कळंबस्ते उमरटवाडी येथील शशिकांत सजणा सनगरे वय 50 या प्रौढाने आपल्या रहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली.

शशिकांत याची पत्नी शुक्रवारी सकाळी आपल्या विवाहीत मुलीस सासरी सोडण्यासाठी आरवली येथे गेली होती तर दुपारी मुलगा सुमित हा नदीवर आघोंळीला गेल्याचे पहाताच शशिकांत याने घराच्या माळ्याच्या वास्याला घरातील दोरी बांधून गळफास घेतला.

दोनच्या सुमारास मूलगा घरी आला असता घराचा दरवाजा बंद पाहून कदाचित आपले वडील झोपले असावेत असे समजून लाकडी रेजातुन हात घालुन दरवाजा उघडला. त्यावेळी वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने ही बाब शेजाऱ्यांना कळवली असता येथील ग्रामस्थांनी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मज्जिद नेवरेकर यांना कळवले, घटनास्थळी जावून नेवरेकर यांनी खात्री करुन याची खबर संगमेश्वर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisements

Related Stories

बदल्यांसाठी शिक्षक संघटना आग्रही

Patil_p

बांदा पोटनिवडणुकीसाठी संदीप बांदेकर यांचा अर्ज दाखल

Ganeshprasad Gogate

जि. प. चा बडतर्फ एक कर्मचारी पुन्हा सेवेत

NIKHIL_N

पहिल्या 30 किमी समुद्री मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरची सुबिया मुल्लाणी प्रथम

NIKHIL_N

दापोलीत वीज पडून तीन महिला, एक बालिका जखमी

Patil_p

तिलारी प्रकल्पाच्या प्रलंबित कामाबाबत बेमुदत आंदोलन

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!