तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 636 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 636 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 429 वर पोहोचली आहे.  

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 263 आणि काश्मीर मधील 373 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 11 हजार 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 959 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 69,979 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 27,638 रुग्ण जम्मूतील तर 41,341 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 1306 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 421 जण तर काश्मीरमधील 885 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त

Patil_p

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार; भाजप आमदाराने उधळली मुक्ताफळे

datta jadhav

नीरव मोदीची आणखी 329 कोटींची संपत्ती जप्त

Patil_p

कोरोना : दिल्लीत दिवसभरात 8,798 नवे बाधित; 39 मृत्यू

Rohan_P

2 ते 18 वर्षीय मुलांवर लस चाचणीची शिफारस

Patil_p

सणासुदीत रेल्वेकडून आणखी 200 ट्रेन

Patil_p
error: Content is protected !!