तरुण भारत

हिरोळी येथे तरुणाचा खून, प्रेत टाकले बोरी पात्रात

प्रतिनिधी / अक्कलकोट

अज्ञात कारणावरून कर्नाटकातील हिरोळी येथील तरुणाचा खून करून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जवळील बोरी नदी पात्रात पोत्यात बांधून प्रेत टाकण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेतील मृत तरुणाचे नाव मल्लप्पा नागप्पा सुनगार ( वय ३५ ,रा हिरोळी ता. आळंद जि. कलबुर्गी )असे आहे.

याबाबतची फिर्याद शहानप्पा सुनगार यांनी दिली आहे. फिर्यादीचा भाऊ हा दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री भजन ऐकण्यासाठी भिमपूर ता. आळंद या गावात गेला होता. मल्लप्पा सुनगार याचा अज्ञात कारणावरून अज्ञात स्थळी, अज्ञात व्यक्तीने डोक्यावर कशाने तरी मारून त्याचे पाय दोरीने गळ्यालगत बांधून पोत्यात घालून त्याचे प्रेत सांगवी येथील बोरी नदीच्या पाण्यातील पात्रात फेकून दिले. शुक्रवारी हा प्रकार उघडीस आला असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड, पो.नि.के.एस. पुजारी, सपोनि नाळे आदीनी भेट दिली. या घटनेची नोंद उत्तर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो.नि.के.एस. पुजारी करीत आहेत. या घटनेमुळे सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गाड्या फोडल्या

Abhijeet Shinde

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या ‘त्या’ शिक्षकास पोलिस कोठडी

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 855 कोरोनामुक्त, नवे 430 रूग्ण

Abhijeet Shinde

सांगलीत कोरोनाचा १२ वा बळी,नवे १३ रुग्ण

Abhijeet Shinde

अंकलखोपचे नितीन नवले राष्ट्रवादीत

Abhijeet Shinde

कडेगाव तहसिलदार कार्यालयाच्या इमारतीवर शोले स्टाईल आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!