तरुण भारत

चोरी करणारी टोळी ४८ तासात जेरबंद

पुलाची शिरोली / वार्ताहर

जबरी चोरीचे गुन्हे करणारी आंतरराज्य टोळी अवघ्या ४८ तासात शिरोली एमआयडीसी पोलीसांकडून कडून जेरबंद करण्यात आली. १) कमरुद्दिन नुर अहमद तिगडोळ्ळी वय – २५ रा. गडकरी गल्ली,तलाव जवळ, कित्तूर , तालुका – कित्तुर जिल्हा – बेळगाव कर्नाटक व २) रियाज बाबुसाब बुड्डणवार वय – २९ ३) अब्दुल लतिफ मोहम्मद गौस तिगडोळ्ळी वय २६ तिघेही रा. गडकरी गल्ली,तलाव जवळ, कित्तूर , तालुका – कित्तुर जिल्हा – बेळगाव कर्नाटक यांना बेळगाव व कित्तुर ,( कर्नाटक) येथे ताब्यात घेऊन त्यांचेकडून चोरी केलेली रोख रक्कम ७००००/- रुपये व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

जूनी चारचाकी माल वाहतूक गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या चिंतामणी संजय मडीवाळ वय वर्षे ३१ , रा. मजरेवाडी ता. शिरोळ या शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांची पिशवी हिसकावून अज्ञातांनी सोमवारी दुपारी पलायन केले होते.

‘ओएलएक्स’ या अॅपवरती अशोक लेलॅन्ड माल वाहतूक ट्रक विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.‌ या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर मडीवाळ यांनी संपर्क साधला व त्या समीर नावाच्या व्यक्तीने आपण निपाणी येथील एजंट आहे. विजापूर, बेळगाव व कोल्हापूर येथून ओढून आणलेल्या गाड्या बघण्यासाठी श्रीराम फायनान्स कंपनीच्या शिये फाटा येथील गोडावूनजवळ या असे सांगितले. त्यानुसार चिंतामणी मडीवाळ हे शिये फाटा येथे आले तेव्हा तिघेजण तेथे वाट बघत थांबलेले होते.त्यातील एकाने मडिवाळ यांच्या खांद्यावर हात ठेवून झोपडपट्टीकडे बोलत बाजूला नेले. दरम्यान सोबत असलेल्या दोघांनी मडिवाळ यांच्या जवळ असलेली सत्तर हजार रुपयांची बॅग हिसकावून घेतली . व तिघांनी पल्सर मोटर सायकल वरुन बेंगलोरच्या दिशेने पलायन केले होते.

फिर्यादी मडीवाळ कडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे मोबाईल नंबर चे लोकेशन घेऊन पोलिसांची टीम बेळगाव येथे पाठवून सदर गुन्ह्यातील आरोपीचे मोबाईल लोकेशन वरून तसेच बातमीदार यांच्या मदतीने या आरोपींना पकडण्यात यश मिळाले.

कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी किरण भोसले, उप निरीक्षक अतुल लोखंडे, रमेश ठाणेकर, घोलराखे,भंडारी, हेड कॉन्स्टेबल समीर मुल्ला, मेतके, सतीश जंगम, प्रशांत काटकर, महेश आंबी, विनायक गुरव, सचिन पाटील ,किरण चव्हाण , सुरेश कांबळे , सायबरचे अजय सावंत यांनी हि कारवाई केली. यातील आरोपी रियाज बुड्डनवार याचे विरुद्ध चोरी व किडण्यापिंग चे गुन्हे दाखल असून त्यांचेकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याच्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

गोकुळचा उद्या 58 वा वर्धापन दिन

Shankar_P

कोल्हापूर : संजय घोडावत ग्रुपच्या चौथ्या ‘स्टार लोकलमार्ट’चे दिमाखात उद्घाटन

triratna

‘यंत्रमाग व्यवसायाला व्याज सवलत देण्याचे सहकार बँकांना आदेश द्यावे’

triratna

कोल्हापूर : बाजार समित्या बंद होणार नाहीत – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

triratna

कोडोली येथे तरुणाची आत्महत्या

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 21 बळी

triratna
error: Content is protected !!