तरुण भारत

मनपा आयुक्तांकडून विविध विकासकामांची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

एपीएमसी रोड शेजारी व्यापारी संकुल, आझमनगर येथे पी. के. क्वॉर्टर्सची इमारत आणि महापालिका कार्यालय आवारात नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याची पाहणी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी शुक्रवारी केली. सदर कामे वेळेवर पूर्ण करून दर्जेदार करण्याची सूचना कंत्राटदार आणि महापालिका अभियंत्यांना केली.

Advertisements

महापालिका मुख्य कार्यालय आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळय़ाच्या मागील बाजूस संसदेच्या प्रतिकृतीतील प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, इमारतीच्या कामाचा दर्जा व विविध रखडलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाच्या मागील बाजूस सुशोभिकरण करण्यात येत आहे. याकरिता विविध साहित्याचा वापर केला जातो. त्याची माहिती आयुक्तांनी घेतली. प्रशासकीय इमारतीचे कामकाज तातडीने पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदाराला केली. तसेच सदर इमारतीचे काम काळजीपूर्वक लक्ष देऊन करण्याचा आदेश महापालिका अभियंत्यांना बजावला.

एपीएमसी रोड शेजारी नेहरुनगर येथे महापालिकेच्या व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. सदर इमारतीच्या कामाची पाहणी करून महापालिका आयुक्तांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपली असून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना केली. व्यापरी संकुलाची इमारत मोठी असल्याने व्यावसायिकांना कोणत्याही अडचणी भेडसावू नये याची दखल घेण्याची सूचना केली. गाळेधारकांना खुली हवा मिळावी आणि सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी घेण्याची सूचना आयुक्तांनी कंत्राटदाराला व मनपा अभियंत्यांना केली. 

सफाई कामगार आयोगाच्या अध्यक्षांकडून पी. के. क्वॉर्टर्स इमारतीची पाहणी

आझमनगर येथे पी. के. क्वॉर्टर्सच्या परिसरात दुमजली इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांसाठी इमारतीची उभारणी करण्यात येत आहे. या परिसरात दोन इमारती बांधण्यात येत असून, हे काम प्रगतीपथावर आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष जगदीश हिरेमनी यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी उभारण्यात येत असलेल्या इमारतीची पाहणी करून इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून कर्मचाऱयांना उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जगदीश हिरेमनी यांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना केली. तसेच सफाई कामगारांचे वेतन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत का? याची माहिती जाणून घेतली. पाहणीवेळी उत्तर विभागाचे शहर अभियंते गंगाधर व साहाय्यक कार्यकारी अभियंते उपस्थित होते. 

Related Stories

कॅन्टोन्मेंट हद्दीतील हायमास्ट-पथदीप बनले शोभेचे

Omkar B

बुडाच्या व्यापारी संकुलात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान

Patil_p

महात्मा फुले मार्केटचे प्रवेशद्वार केले सील

Patil_p

खरेदीसाठी नागरिकांकडून नियमावलीचे उल्लंघन

Amit Kulkarni

राजू कागिनकरसह दिवंगत क्रिकेटपटूंना विविध मंडळांकडून श्रद्धांजली

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Patil_p
error: Content is protected !!