22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

पाकचाही चीनला दणका; ‘टिकटॉक’वर घातली बंदी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

‘टिकटॉक’ या चीनच्या लोकप्रिय ॲपवर भारत आणि अमेरिकेने बंदी घातल्यानंतर चीनचा जवळचा मित्र असलेल्या पाकिस्ताननेही ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲपमुळे समाजात अश्लीलला पसरत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तान दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

भारत आणि अमेरिकेने टिकटॉक ॲप देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारे तसेच यूजर्सना असुरक्षित असल्याचे कारण देत त्यावर बंदी घातली. मात्र, इम्रान खान सरकारने वेगळ्याच कारणाने या ॲपवर बंदी घातली आहे. या ॲपमुळे अनैतिक गोष्टीला प्रोत्साहन मिळत असून समाजात अश्लीलता पसरत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. 

या ॲपमुळे समाजात अश्लीलला पसरत असल्याचा आरोप ठेवत पाकिस्तान दूरसंचार विभागाने टिकटॉकला चेतावणी दिली होती. मात्र, यानंतरही टिकटॉककडूून कोणतीही कार्यवाही न झाल्याने या ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय पाक सरकारने घेतला.

Related Stories

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 15,048 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

न्यूझीलंड : ‘स्टफ’ मीडिया कंपनीची कवडीमोलाने विक्री

datta jadhav

लिपुलेखनजीक नेपाळकडून सैन्य तैनात

Patil_p

शरद पवार सकाळी 11 वाजता साधणार जनतेशी संवाद

prashant_c

कोरोनासाठी दिल्ली सरकारकडून ट्विटर हॅंडल

pradnya p

ड्रोनद्वारे नव्हे, तर खेचरांद्वारे चिनी सैन्याला पुरवली जातेय रसद

datta jadhav
error: Content is protected !!