तरुण भारत

निपाणीत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

बसस्थानक परिसरात भीतीचे वातावरण : चार दुकान गाळे फोडण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी/ निपाणी

Advertisements

निपाणी बसस्थानक परिसरातील मानवी कॉम्प्लेक्स नजीकचे 4 दुकान गाळे फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. चोरटय़ांनी या दुकान गाळय़ांचे शटर उचकटले असल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे. तर मुख्य मार्गावरीलच दुकाने फोडून चोरटय़ांनी निपाणी पोलिसांना थेट आव्हान दिले आहे.

गेल्या पंधरवडय़ात अमलझरी येथील रेणूका मंदिरातील चोरीसह चंदनाचे झाडही चोरटय़ांनी तोडून नेले होते. याशिवाय श्रीनगर येथील महेश जाधव यांचे बंद घर फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला होता. यातच आता बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर असणारी दुकाने चोरटय़ांनी लक्ष्य केल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, बसस्थानक परिसरातील मानवी कॉम्प्लेक्स व दोशी कॉम्प्लेक्स येथे अनेक व्यावसायिकांची दुकाने आहेत. गुरुवारी रात्री व्यावसायिक आपली दुकाने बंद करून घराकडे गेले असता रात्रीच्यावेळेस चोरटय़ांनी श्रीदत्त कॉम्प्युटर, प्रथमेश बाईक सेंटर, सज्जन आर्टस, वर्मा एजन्सीज, प्रथमेश बुक स्टॉल या दुकानांची लोखंडी शटर उचकटली असल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. मात्र दुकानातील साहित्य अथवा रोख रक्कम चोरण्यात चोरटे अयशस्वी झाले.

कोरोना व लॉकडाऊनमुळे यापूर्वी व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी व्यावसायिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच चोरटय़ांनी दुकाने लक्ष्य करण्यास प्रारंभ केल्याने व्यावसायिकांनी भीती व्यक्त केली आहे. निपाणी पोलिसांना यापूर्वीच्या चोऱयांचा छडा लावण्यास अद्याप यश आलेले नाही. त्यातच या घटनेने चोरटय़ांनी निपाणी पोलिसांना थेट आव्हान दिल्याने पोलिसांच्या भूमिकेकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. घटनास्थळी निपाणी शहर स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक आर. बी. शेख, हवालदार राजू दिवटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

रामनगरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे पसार

गुरुवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास संशयित चोरटे रामनगर परिसरात फिरत असल्याचे बाळासो तराळ यांना दिसून आले. त्यांनी लागलीच परिसरातील युवकांना याची माहिती दिली. त्यानुसार संजय सुर्यवंशी, संदेश सुर्यवंशी, विजय धुमाळ, अमाल धुमाळ, रवि खोत, उत्तम सुर्यवंशी आदींनी परिसरात पाहणी केली. त्यामुळे संशयित चोरटय़ांनी या भागातून पळ काढला.

Related Stories

महापुरात संसार उद्ध्वस्त होऊनही नुकसानभरपाई नाही

tarunbharat

झिरोपॉईंट, मुदतबाहय़, ठोस कागदपत्रे नसल्याने शेतकऱयांचा विजय

Patil_p

अन्… केंद्रीय मंत्र्यांनी स्वतःला सावरले

Patil_p

इंडियन ऑईल सायक्लोथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

तीन कराटेपटूंना ब्लॅकबेल्ट प्रदान

Patil_p

बालिका आदर्श शाळेचे सहशिक्षक एकनाथ पाटील यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!