तरुण भारत

हॉनरची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे बाजारात

नवी दिल्ली 

 हुवाई कंझ्युमर ग्रुपची कंपनी हॉनर यांची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे नुकतीच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली. इएस व जीएस प्रो या नावाने ही स्मार्ट घडय़ाळे भारतात दाखल झाली आहेत. इएस वॉच 1.6 इंच अमोलेड डिस्प्लेच्या सुविधांनी युक्त असणार असून जीएस प्रो 25 दिवसांच्या बॅटरी क्षमतेसह सादर करण्यात आले आहे. तंत्रज्ञान व नाविन्यतेत हॉनरने आपला ब्रँड चांगलाच लोकप्रिय बनवला आहे. त्यांच्या नव्या उत्पादनांवर ग्राहकांचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असते. त्यांच्या वेअरेबल उत्पादनांना भारतासह इतर देशांनीही पसंती दर्शवली आहे.

Related Stories

हळद दुधानंतर आता अमूलचे हळदयुक्त आईस्क्रीम बाजारात

Omkar B

जेके टायरचा आता हॅण्ड सॅनिटायझयर

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टीने रचला नवा उच्चांक

Patil_p

संमिश्र संकेतांच्या दिशेने…

Patil_p

खादी प्राकृतिक पेंटचे सादरीकरण

Patil_p

देशातील 37 टक्के महिलांनी सोने खरेदी केलीच नाही?

Patil_p
error: Content is protected !!