तरुण भारत

गुजरातमध्ये नवरात्रोत्सव गरब्याविना!

कोरोना संसर्गाचा परिणाम : मूर्ती-देवी पूजनाला अनुमती : मात्र प्रसाद वाटपाला बंदी

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisements

देशात अद्यापही कोरोना संसर्ग कमी झालेला नसल्यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्यात आलेले नाहीत. गर्दीवर नियंत्रण ठेवत सण-उत्सव साजरे करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यामुळे बहुतांश राज्यांनीही पुढील आठवडय़ात सुरू होणारा नवरात्रोत्सव कोरोना नियमावलीनुसार साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही मंदिरेही खुली करण्यात आली नसून खुल्या जागा आणि मैदानावर आयोजित केला जाणारा गरबा-दांडियाचा जल्लोष यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली झाकोळून जाणार आहे.

गुजरात सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून यंदा नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यावर बंदी घातली आहे. गुजरात सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून सण-उत्सवासाठी शुक्रवारी नियमावली जारी केली आहे. नवरात्री गरबा, दसरा, दिवाळी, गुजराती नवीन वर्ष आणि शरद पौर्णिमाच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱया कार्यक्रमासाठी सदर नियम बंधनकारक असणार आहेत. 15 ऑक्टोबर 2020 पासून राज्यात हे नियम लागू होणार आहेत. गुजरात सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, नवरात्रीमध्ये सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करु शकता. पण, फोटो किंवा मूर्तीला स्पर्श करणे आणि प्रसाद वाटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासानच्या संमतीनंतर देवीच्या मूर्तीची स्थापना करता येईल.

नव्या कोरोना नियमावलीनुसार रॅली, रावण दहनाचा कार्यक्रम, शोभा यात्रा आणि रामलीलासारख्या कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच या कार्यक्रमासाठी फक्त एक तासाचा वेळ देण्यात आला असून भाविकांना सहा फूटांचे सामाजिक अंतर राखण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची असल्यास सॅनिटायजर किंवा हँडवॉश जवळ असावे. कार्यक्रमादरम्यान थुंकल्यास मोठा आर्थिक दंड आकरण्यात येणार आहे. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱयांना आणि 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱयांना कार्यक्रमात येण्यास बंदी आहे. शिवाय गर्भवती आणि इतर आजार असणाऱयांनाही कार्यक्रमात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Related Stories

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखलं

Abhijeet Shinde

जम्मू – काश्मिर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

Rohan_P

राष्ट्रपतींकडून स्वतःच्या पगारात 30 टक्के कपात

Rohan_P

श्रमिक विशेष ट्रेन उत्तरप्रदेशातील बलियाऐवजी पोहचली नागपूरला

datta jadhav

10 मोठय़ा कर्जधारकांमध्ये पाकिस्तान सामील

Patil_p

टॉक्सिक नात्यात राहिलेय!

Patil_p
error: Content is protected !!