तरुण भारत

सांगरुळ आठवडी बाजार व एसटी सेवा सुरू करावी

सांगरुळ / प्रतिनिधी

सांगरूळ (ता.करवीर ) येथे मार्च अखेर पासून कोरोनामुळे बंद असलेला आठवडी बाजार सुरू करावा, तसेच नागरिकांना प्रवासाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी एस.टी.सेवा सुरु करावी, अशी मागणी सांगरूळ व्यापारी असोसिएशनच्यावतीने ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोरोना व लॉकडाऊनमध्ये आठवडी बाजार व एस.टी.सेवा बंद होती. आता सर्वत्र बाजार सुरू होत आहेत, एस.टी.सुरू होत आहे. या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील आठवडी बाजार सुरू करावा गावात व मुक्काम एस.टी. सुरू करावी, त्यासाठी ग्रामपंचायतीने एस.टी. खात्याशी पत्रव्यवहार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर मागणीचे निवेदन सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, सदस्य सरदार खाडे यांना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी नाळे, दीपक घोलपे, उदय म्हेत्तर, प्रकाश पाटील, अर्जुन मोहिते, स्वप्नील ढवळे, नागेश संगम यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Related Stories

पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात; एक जागीच ठार

Abhijeet Shinde

65 लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीज बिल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गांधीनगर बनतेय गुटखा विक्रीसाठीचं मुख्य केंद्र

Abhijeet Shinde

आर के नगर विद्युत वितरण कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार थांबेना

Abhijeet Shinde

गांधीनगरात चारचाकी गाडीसह २.६१ लाखांची बेकायदेशीर दारु जप्त

Abhijeet Shinde

बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवू – मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!