तरुण भारत

मायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारी मायक्रोसॉफ्ट ही पहिली कंपनी आहे. 

Advertisements

मायक्रोसॉफ्टच्या अधिकारी कॅथलीन होगन यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. कर्मचारी घरून काम करण्याचा पर्याय निवडू शकतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कंपनीला जानेवारीपर्यंत अमेरिकेतील आपले कार्यालय पुन्हा सुरु होण्याची आशा नाही. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कार्य लवचिकता दिली आहे. 

ज्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत किंवा इतर देशात स्थानांतर करणे शक्य आहे. त्यांना त्यांच्या वेतनाच्या बदल्यात कोठे जातात यावर आधारित पैसे मिळतील, असेही या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

‘आयटी’त चार लाखाहून अधिक होणार भरती

Patil_p

अनेक ग्राहकांचा कल आता क्रेडिट कार्डकडे

Amit Kulkarni

‘गुगल पे’ची अन्य देशात पैसे पाठविण्याची सुविधा लवकरच

Patil_p

रेल्वेची विशेष फे-यांमधून 20 कोटीची कमाई

Patil_p

कोका, पेप्सी-बिस्लेरीवर 72 कोटीची दंड आकारणी

Patil_p

इन्फोसिसचा समभाग सलग आठव्या दिवशी तेजीत

Patil_p
error: Content is protected !!