तरुण भारत

टपाल दिनानिमित्त जी.जी.चिटणीस शाळेची जागृतीफेरी

प्रतिनिधी / बेळगाव

जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून शनिवारी टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस इंग्रजी मीडियम हायस्कूलच्या अलायन्स क्लब व फिलॅटेली क्लबतर्फे जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीविषयीही जागृती करण्यात आली.

टिळकवाडी येथील शाळेपासून व्हॅक्सिन डेपो येथील पोस्ट कार्यालयापर्यंत ही फेरी काढण्यात आली. पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱयांना टपाल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोस्ट कर्मचाऱयांना पोस्टमास्तर संध्या नंदिनी यांच्या उपस्थितीत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या फेरीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जिल्हा प्रांतपाल डॉ. नविना शेट्टीगार, ट्रस्टचे सचिव तसेच जे÷ फिलॅटेलिस्ट दीपक पै-धुंगट, उपमुख्याध्यापिका स्वाती घोडेकर, फिलॅटेली क्लबच्या प्रमुख ज्योती चौगुले यासह शिक्षकवर्ग व इतर कर्मचाऱयांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. 

Related Stories

दुचाकी अपघातात दोघे ठार

Patil_p

साईराज, डीयूएफसी, युनायटेड ब्रदर्स संघ विजयी

Amit Kulkarni

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांची निदर्शने

Amit Kulkarni

निपाणीत शुकशुकाट, फक्त पाखरांचा किलबिलाट…!

tarunbharat

दैवज्ञ स्पोर्ट्स, आनंद अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

अबब एकाच ठिकाणी आढळले पाच साप

Amit Kulkarni
error: Content is protected !!