तरुण भारत

भाग्योदय महिला सोसायटीच्यावतीने बी.आय.पाटील यांना श्रद्धांजली

वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र, म. ए. समितीचे धडाडीचे ज्येष्ठ नेते, सलग चार वेळा निवडून आलेले म. ए. समितीचे माजी आमदार बी. आय. पाटील यांचे निधन झाले. कंग्राळी खुर्द येथील भाग्योदय मल्टीपर्पज सोसायटी व भाग्योदय महिला सोसायटीच्यावतीने शनिवारी सोसायटीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisements

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे व्हा. चेअरमन जी. जी. कंग्राळकर होते. प्रारंभी संस्थेचे सल्लागार एम. एम. पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कै. माजी आम. बी. आय. पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी एम. एन. पाटील यांच्यासह संस्थेच्या संचालक व सल्लागार मंडळाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाग्योदय महिला सोसायटीच्या संचालक सल्लागार मंडळाच्यावतीनेही त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

बी. आय. पाटील हे कंग्राळी खुर्द गावाबरोबर तालुका व म. ए. समितीचे भूषण होते. ते सर्वसामान्यांचे कैवारी होते. म. ए. समितीच्या माध्यमातून ते सलग चार वेळा महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार म्हणून निवडून आले होते. सीमाप्रश्न त्वरित सुटावा हा त्यांचा अखेरपर्यंत ध्यास होता. त्यांच्या जाण्याने सीमाभागाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात भाग्योदय महिला सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी निलजकर, कायदा सल्लागार ऍड. सतीश बांदिवडेकर, संचालक शिवाजी मुतगेकर, सल्लागार रविंद्र कोलकार, जी. जी. कंग्राळकर आदींनी श्रद्धांजलीपर भाषणामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.

तत्पूर्वी भाग्योदय मल्टीपर्पज सोसायटी व भाग्योदय महिला सोसायटीच्यावतीने शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाग्योदय मल्टीपर्पज सोसायटी व भाग्योदय महिला सोसायटी या दोन्ही सोसायटींचे संचालक, सल्लागार, भागधारक, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. 

Related Stories

कोरोनाकाळात विधेयक मंजूर करायचे थांबवा

Patil_p

कुद्रेमनी ग्रा. पं. नवनिर्वाचित सदस्यांना अधिकृत सदस्यपद प्रमाणपत्राचे वितरण

Patil_p

गणाचारी गल्ली येथील युवकाची आत्महत्या

Rohan_P

परिवहनला दैनंदिन 60 लाखांचा फटका

Patil_p

बेकायदा दारू विकणाऱया दोघा जणांना अटक

Patil_p

• काळजी… मुलांसह सुना अन् नातवंडांचीही

Patil_p
error: Content is protected !!