तरुण भारत

राजस्थान-हैद्राबाद आज चुरशीचा सामना

वृत्तसंस्था/ दुबई

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील चुरशीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या सामन्यात राजस्थान संघाकडून बेन स्टोक्स हे पुनरागमन होण्याची शक्यता असल्याने सनरायजर्स हैद्राबादचा संघ आपल्या डावपेचात बदल करण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेत स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी निराशाजनक झाली असून सलग चार पराभवानंतर हा संघ पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत या स्पर्धेत दोन सामने जिंकले असून सलग चार सामने गमविले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात राजस्थान रॉयल्सचा संघ शेवटून दुसऱया स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैद्राबाद संघाची कामगिरी बऱयापैकी झाली असून त्यांनी आतापर्यंत तीन सामने जिंकले असून स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर आहे. रविवारच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स संघामध्ये बेन स्ट्रोक्सचा समावेश केला जाणार असल्याने सनरायजर्स हैद्राबाद संघाला आपल्या डावपेचात बदल करावे लागतील. इंग्लंडचा स्टोक्स याला ठराविक कालावधीकरिता क्वारंटाईन करण्यात आले होते आणि त्याच्या क्वारंटाईनची मुदत शनिवारी संपत आहे. स्टोक्सची उणीव राजस्थान रॉयल्स संघाला यापूर्वीच्या सामन्यात चांगलीच भासली आहे. 29 वर्षीय स्टोक्सने आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. गेल्या ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये पाक विरूद्ध झालेली कसोटी मालिका स्टोक्सने अर्धवट सोडली होती. स्टोक्सच्या वडिलाना मेंदूचा कर्क रोग झाल्याने स्टोक्स न्यूझीलंडला रवाना झाला होता. राजस्थान रॉयल्स संघाला यापूर्वीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलकडून 46 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत दिल्लीने गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.

सनरायजर्स हैद्राबाद संघाची या स्पर्धेतील स्थिती राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत निश्चितच समाधानकारक आहे. गेल्या गुरूवारी झालेल्या सामन्यात बेअरस्टो आणि रशीद खान यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सनरायजर्स हैद्राबादने पंजाबचा 3 गडय़ांनी पराभव केला होता. बेअरस्टो, कर्णधार वॉर्नर, विल्यम्सन, मनिष पांडे यांच्यावर हैद्राबाद संघाची फलंदाजीत प्रामुख्याने मदार राहील. 

Related Stories

पहिल्या सामन्यात भारताची अर्जेन्टिनावर मात

Patil_p

बंदी संपणाऱया ऍथलिटस्ना ऑलिम्पिकची अनपेक्षित संधी

Patil_p

यूएस ओपन पूर्वतयारी स्पर्धेत जोकोविच विजेता

Patil_p

अश्विन पुढील सामन्यासाठी उपलब्ध, पण…

Patil_p

पाच फुटबॉल क्लब्सना परवाना मिळविण्यात अपयश

Patil_p

इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धा लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!