तरुण भारत

कोरोना, हिवाळा प्रदूषणाचा तिहेरी मारा

पुढील 4 महिने अधिक खबरदारी बाळगणे महत्त्वाचे ठरणार

लॉकडाउनमुळे जगभरात प्रदूषणात घट झाली असली तरीही पुन्हा ‘हवा’ बिघडू लागली आहे. कोरोनामुळे एकीकडे फुफ्फुसांमधील संसर्ग आणि मृत्यू वाढले असताना आता प्रदूषण ही समस्या अधिकच वाढविणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दमा आणि कार्डियोचे रुग्ण वाढतात.

Advertisements

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात या दोन्ही आजारांचे रुग्ण आणि वृद्धांना अधिकच सतर्क राहण्याची गरज आहे. मागील वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रदूषणाचा पीएम 127 आणि 103 होता. जो यंदा वाढून 138 आणि 186 पर्यंत पोहोचला आहे.

तिहेरी हल्ल्याचा धोका

हिवाळा : यामुळे वृद्ध आणि दम्याच्या रुग्णांची फुफ्फुसे पूर्णपणे काम करू शकत नाहीत. दम्याच्या रुग्णांना हिवाळय़ात तसाही त्रास वाढतो, हृदयविकाराच्या रुग्णांनाही अधिक धोका असतो.

प्रदूषण : याची पातळी हिवाळय़ात अधिक वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ होते. दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दमा आणि कार्डियक प्रॉब्लेम वाढण्याचे हे देखील कारण आहे.

कोरोना : हा विषाणू थेट फुफ्फुसांवर आक्रमण करत आहे. विषाणू दमा आणि कार्डियक रुग्णांना गंभीर स्थितीत नेऊ शकतो.

मोठे आव्हान

दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत दमा, कार्डियक रुग्ण वाढतात. यंदा कोरोनामुळे स्थिती अधिक आव्हानात्मक आहे. धोका जीवघेणा असल्याचे लोकांना समजून घ्यावे लागेल. सणांचा आनंद स्वकीयांसोबत साजरा करावा. केवळ एक वर्षे फटाके न फोडल्याने आनंद कमी होणार नाही.

प्रदूषण कमी व्हावे

लॉकडाउनपासून अनलॉक होताच 4 महिन्यांमध्ये हवा पुन्हा प्रदूषित होऊ लागली आहे. दिवाळीच्या काळात प्रदूषण अनेक पटीने वाढते. रुग्णांच्या हिताकरता कोरोनाकाळात तरी कमीतकमी प्रदूषण राखण्याची गरज आहे.

Related Stories

नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकन

Patil_p

बुर्ज खलिफावर उभं राहून शूट केली जाहिरात

Patil_p

इंडोनेशिया : भूकंपात 60 घरांचे नुकसान, 7 ठार

datta jadhav

3 वर्षांपासून ‘जिवंत’ सिद्ध करण्याची लढाई

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 2 लाख 70 हजारांवर

datta jadhav

नवाज शरीफ यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा

datta jadhav
error: Content is protected !!