तरुण भारत

सोलापूर : जेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे हृदयविकाराने निधन

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

सोलापूरच्या ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यिक निर्मला उत्तरेश्वर मठपती यांचे हृदयविकाराने निधन झाले. शनिवारी रात्री साडेदहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७२ वर्षाच्या होत्या.

मनातलं आभाळ, बापडी माणसं, गुणी मुलं, काव्यरूप शामचीआई, झेट नावाचं बेट, मुलांसाठी उद्बोधक गोष्टी, वेटिंग लिस्ट आणि संस्काराची शिदोरी यासह ३५ हून अधिक त्यांची बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कादंबरी लेखनही केलं होतं

इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातून ‘मुग्धा लिहू लागली’ हा धडा प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. निर्मला मठपती या महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या कार्यकारणी सदस्य होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज, रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisements

Related Stories

सोलापूर : करमाळा तालुक्यासाठी ३० कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर : जिल्हा परिषद अध्यक्ष

triratna

सैन्याच्या गस्त तुकडीचे डोळे व कान म्हणजे स्काऊट

prashant_c

सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 245 कोरोना पॉझिटिव्ह, 8 जणांचा मृत्यू

triratna

नुकसानीचा राजकीय ‘पंचनामा’

triratna

सोलापूर : महिलेच्या विनयभंग प्रकरणी जेऊर येथील एकावर गुन्हा दाखल

triratna

मंगळवेढयातील नगराध्यक्षांच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन चौथ्या दिवशी स्थगित

triratna
error: Content is protected !!