तरुण भारत

मालीम-बेती येथे बेकायदेशीर मासेविक्रीवर बंदी

प्रतिनिधी/ पर्वरी

मडगाव मासळी मार्केटच्या धर्तीवर मालीम-बेती येथे पहाटेपासून मोठय़ाप्रमाणात मासळी विक्री करणाऱयाविरुद्ध मांडवी फिशरीस सोसायटी व स्थानिक रहिवाश्यांनी पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीने कारवाई करण्याची लेखी तक्रार दाखल केल्यानंतर सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी काल सकाळी घटनास्थळी जाऊन मासेविक्रेत्यांना मासे विक्रीचा मज्जाव केला.

Advertisements

प्राप्त माहितीनुसार काही दिवसापासून मालीम-बेती येथे मांडवी पुलाच्या खाली असलेल्या मोकळय़ा जागेत मासे टेम्पोने आणून पहाटे विकण्यास काही मासे विक्रेत्यांनी सुरवात केली. त्यानंतर हळूहळू या ठिकाणी घाऊक मासे विपेत्यांनी मोठय़ा प्रमाणात मासेविक्री सुरू केली. त्यामुळे दुचाकीवरून किंवा अन्यप्रकारे गावोगावी जाऊन मासेविक्री करणाऱयांची मासे खरेदीसाठी मोठय़ा संख्येने गर्दी होऊ लागली. जवळ मालीम-जेटीवर मासेविक्री करणारी स्टॉल आहे. त्याच्यावर परीणाम होऊ लागला. तसेच सकाळी वाहने व मासे खरेदी करण्याची संख्या यामुळे एकत्र होणारी गर्दी यामुळे स्थानिकांना त्रास जाणवू लागला.

या ठिकाणी मासे विक्री करणाऱयांनी पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीकडून कायदेशीरपरवाना घेतला नाही. यामुळे पंचायतीचे उत्पन्न बुडाले त्या प्रकरणी मांडवी फिशरीज सोसायटीने तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. सरपंच चोडणकर यांनी दखल घेऊन काल शुक्रवारी मालीम-बेती येथे जाऊन मासेविक्रेत्यांना बेकायदेशिर मासेविक्री करण्यास हरकत घेतली. या जागेवर मासेविक्री करू नये अशी समज देऊन मासेविक्री करण्यास बंदी घातली. या प्रसंगी सरपंचासमवेत स्थानिक पंचसदस्य फ्रान्सिस डिसोझा, सामाजिक कार्यकर्ते पंकज वेर्णेकर, नारायण नाईक उपस्थित होते.

पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीने या प्रकरणी लेखी तक्रारीची प्रत पर्वरी पोलीस स्थानकात दाखल केली आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Related Stories

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी घेतले म्हापसा सार्वजनिक गणपतीचे दर्शन

Patil_p

कोरोना : 5 बळी, 240 नवे बाधित

Amit Kulkarni

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p

उतोर्डा समुद्रकिनाऱयावर बुडून हलकर्णीतील युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

पिसुर्ले खाणीच्या खंदकातील पाण्याची पातळी वाढली

Patil_p

‘ओबीसी’च्या आरक्षीत नोकऱया त्वरीत भराव्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!