तरुण भारत

शनिवारी कोरोनाचे आठ बळी

नवे रुग्ण 343, तर 460 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

कोरोनामुळे शनिवारी आठ जणांचे बळी गेले असून बळींची आतापर्यंतची एकूण संख्या 499 झाली आहे. शनिवारी 343 नवे रुग्ण सापडले तर 460 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या 4658 सक्रिय रुग्ण असून ते विविध हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 37934 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 32777 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

काल शनिवारी संशयित रुग्ण म्हणून 57 जणांना इस्पितळात भरती करण्यात आले असून 233 जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे.

विविध आरोग्य केंद्रांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : डिचोली 126, सांखळी 269, पेडणे 173, वाळपई 168, म्हापसा 243, पणजी 174, हळदोणा 127, बेतकी 58, कांदोळी 216, कासारवर्णे 66, कोलवाळ 105, खोर्ली 200, चिंबल 270, शिवोली 187, पर्वरी 285, मये 33, कुडचडे 104, काणकोण 127, मडगाव 296, वास्को 270, बाळ्ळी 71, कासावली 87, चिंचिणी 32, कुठ्ठाळी 151, कुडतरी 73, लोटली 60, मडकई 61, केपे 94, सांगे 96, शिरोडा 45, धारबांदोडा 72, फोंडा 237, नावेली 81.

गोव्यात आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

10 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण रुग्ण                  37934

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                        32777

सध्याचे सक्रिय रुग्ण                                  4658

10 ऑक्टोबर रोजीचे नवे रुग्ण                    343

10 ऑक्टोबर रोजी बरे झालेले रुग्ण 460

10 ऑक्टोबर रोजीचे बळी             08

10 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण बळी                  499

Related Stories

काँग्रेसचे धोरण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा

Amit Kulkarni

भारताच्या खऱया इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान द्या

Patil_p

कोंगारे-सांगे येथील पूल धोकादायक

GAURESH SATTARKAR

‘त्या’ बारा आमदारांना चौदा दिवस दिलासा

Omkar B

ओल्ड गोवा, करमळीत सर्वत्र जलमय परिस्थिती

Amit Kulkarni

सुकूर पंचायतीच्या सरपंचपदी अनिल पेडणेकर यांची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!