तरुण भारत

आसाम : मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी भाजपच्या सात आमदारांचा दिल्लीत ठिय्या

ऑनलाईन टीम / दिसपूर : 

आसाममध्ये मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी त्रिपुरातील भाजपचे सात आमदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. सुदीप रॉय बर्मन यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या मांडलेल्या आमदारांनी आपल्याला आणखी दोन आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

Advertisements

आसाम विधानसभेतील 60 जागांपैकी 36 जागांवर भाजपचे आमदार आहेत. तसेच इंडियन पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे (आयपीएफटी) आठ आमदारही देब सरकारला पाठिंबा देत आहेत. सुदीप रॉय बर्मन यांच्यासह सुशांत चौधरी, आशिष शहा, आशिष दास, दिवाचंद्र रणखल, बर्ब मोहन त्रिपुरा, परिमल देब बर्मन आणि रामप्रसाद पाल या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना हुकूमशाही, अनुभवहीन आणि अलोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. 

बिरेंद्र किशोर देब बर्मन आणि बिप्लब घोष हेही आमच्यासोबत असल्याचा दावा आमदार चौधरी यांनी केला आहे. तर त्रिपुरा भाजप अध्यक्ष माणिक शहा म्हणाले, सरकार पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की सात-आठ आमदार सरकार पाडू शकत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोखा नाही.

Related Stories

महामार्गावर उतरणार वायुदलाची विमाने

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात दुध,औषध, वृत्तपत्र भाजीपाला, गॅस वगळता सर्वच बंद

triratna

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये ‘आपत्ती’

Patil_p

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 3.33 लाख पार

Rohan_P

कुख्यात खुनी उमेश रेड्डीची फाशी कायम

Patil_p

आता शाहीनबागमध्ये गोळीबार

Patil_p
error: Content is protected !!