तरुण भारत

सांगली जिल्ह्यात नवे 277 रुग्ण, तर 546 कोरोनामुक्त

जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 82 वाढलेः ग्रामीण भागात 195 वाढलेः आजअखेर 35 हजार 383 रूग्णांची कोरोनावर मात

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवीन 277 रूग्ण वाढले. 546 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आजअखेर 35 हजार 383 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर एक हजार 520 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

महापालिका क्षेत्रात नवे 82 रूग्ण वाढले

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात रविवारी पुन्हा नवीन 82 रूग्ण वाढले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसापासून महापालिका क्षेत्रात 50 पेक्षा कमी रूग्ण वाढत होते. पण रविवारी पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ होवून 82 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात 50 तर मिरज शहरात 32 रूग्ण वाढले आहेत. आजअखेर मनपा क्षेत्रात 15 हजार 447 रूग्ण झाले आहेत. यातील 85 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.

ग्रामीण भागात 195 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्र वगळता इतर ग्रामीण भागात मात्र रविवारी चांगलाच दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसानंतर रविवारी ग्रामीण भागात 200 पेक्षा कमी रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही रूग्णवाढीचा वेग आता कमी होत चालला आहे. रविवारी 195 नवीन रूग्ण वाढले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 24, जत तालुक्यात नऊ, कडेगाव तालुक्यात 14 तर कवठेमहांकाळ तालुक्यात 11 नवीन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 26, मिरज तालुक्यात 17, पलूस तालुक्यात 21 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात 22, तासगाव तालुक्यात 19 आणि वाळवा तालुक्यात 32 रूग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात उपचार सुरू असताना आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील एकाचा, खानापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यातील दोघांचा तर तासगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 520 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

परजिल्ह्यातील नवे आठ रूग्ण वाढले

परजिल्ह्यातील रूग्णांच्यावरही जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी परजिल्ह्यातील नवीन आठ रूग्ण वाढले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे, बेळगाव जिल्ह्यातील पाच आणि सातारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 275 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार 24 रूग्ण बरे झाले आहेत. तर 57 रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर 194 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे

35 हजार 383 रूग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात रविवारी 546 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हयात आजअखेर 35 हजार 383 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 85 टक्केच्यावर गेला आहे. सध्या जिल्ह्यात उपचारार्थ रूग्णसंख्या ही चार हजार 268 इतकी आहे.

दोन हजार 334 स्वॅब तपासले

जिल्ह्यात रविवारी दोन हजार 334 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीचे 691 स्वॅब तपासले तर रॅपीड ऍण्टीजनचे एक हजार 643 स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये नवीन 277 रूग्ण आढळून आले आहेत.

नवीन रूग्ण 277
उपचारात 4268
बरे झालेले 35383
एकूण 41171
मृत्यू 1520

Advertisements

Related Stories

स्मशानभूमीतल्या कोरोना योद्धय़ाला मृत्यूने कवटाळले

Abhijeet Shinde

आता घर बसल्या मिळणार नवरात्र संगीत मैफिलीची मेजवानी

Abhijeet Shinde

सांगली : कोल्ह्याच्या हल्ल्यात चार महिलांसह पाच जण जखमी

Abhijeet Shinde

जत तालुक्यातील विस्तारीत म्हैसाळ योजनेचे काम त्वरीत सुरू करा : प्रकाश जमदाडे

Abhijeet Shinde

सांगलीत अग्नीशमनची प्रात्यक्षिके

Abhijeet Shinde

सांगली : आयर्विन पुलाजवळील बंधाऱ्यावर झाडे अडकल्याने धोका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!