तरुण भारत

भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राहूल महाडीक यांची निवड

इस्लामपूर /प्रतिनिधी

इस्लामपूर वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडीक यांची भारतीय जनता पार्टी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी मुंबई येथे निवड करण्यात आली. युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

राहुल महाडीक यांना वनश्री नानासाहेब महाडीक यांचा वारसा आहे. त्यांनी अल्प वयात तरुणांचे संघटन केले आहे. सांगली जिल्ह्यातील सामाजिक, औद्योगिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी छाप पाडली आहे. त्यामुळेच भाजपाने राहुल महाडीक यांची भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली. गेले अनेक वर्षे शिक्षण संस्था व क्रेडिट सोसायटी, सूतगिरणीच्या माध्यमातून औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात राहूल महाडिक अग्रेसर आहेत. येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातुन सर्वात कमी वयाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. या पाच वर्षाच्या काळात या मतदारसंघात विकास काय असतो हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले.

यावेळी राहुल महाडीक म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आ.सदाभाऊ खोत, युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांमुळे आपणास संधी मिळाली असून या संधीचे सोने करु. येणाऱ्या काळात भाजपा वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून युवकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहू अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

Advertisements

Related Stories

सांगली : ऑनलाईन शॉपिंगमध्ये साडेचार हजाराचा गंडा

Abhijeet Shinde

सांगलीत महापुराचा विळखा सैलावला

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेतील मंगल कार्यालयाला ५० हजारांचा दंड

Abhijeet Shinde

मिरज रेल्वे जंक्शनवर रिक्षा स्टॉपला परवानगी द्या

Abhijeet Shinde

सांगली : कसबे डिग्रजमध्ये बिबट्यानंतर आता मगरीची दहशत

Abhijeet Shinde

भाजपाच्या सुमन भंडारे पंचायत समितीच्या सभापती

Sumit Tambekar
error: Content is protected !!