तरुण भारत

रविवारी जिल्हय़ात 194 नवे रुग्ण

रविवारी जिल्हय़ात कोरोनाचे 194 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांची संख्या 22 हजारावर पोहोचली असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन महिलांसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील बाधितांची संख्या वाढतच चालली आहे.

रविवारी प्रयोगशाळेतून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 194 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 44 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांतील 34 व ग्रामीण भागातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 331 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Advertisements

आतापर्यंत 1 लाख 81 हजार 291 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 1 लाख 53 हजार 9 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 19 हजार 566 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1 हजार 993 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेतून आणखी 5 हजार 272 अहवाल यायचे आहेत. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 35 हजार 542 जण अद्याप चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. यापैकी लक्षणे असणाऱयांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. रविवारी गोकाक तालुक्मयात 110 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गणेशपूर, काकती, कंग्राळी बी. के., खादरवाडी, सुळगा (ये.), तारिहाळ, अशोकनगर, भाग्यनगर, न्यू गांधीनगर, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, शाहूनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर, सुभाषनगर, शेट्टी गल्ली, विश्वेश्वरय्यानगर, टीव्ही सेंटर, भाग्यनगर, हनुमाननगर, खडक गल्ली, मजगाव, कपिलेश्वर कॉलनी, केएलई कॅम्पस, कुमारस्वामी लेआऊट, महांतेशनगर परिसरात रविवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

गुरु हेच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार : प्रा.डॉ. किशोर गुरव

Omkar B

बापटगल्ली कालिकादेवी युवक मंडळाच्या पदाधिकाऱयांची निवड

Amit Kulkarni

मालवाहू ट्रक कोसळून दोन ठार

Patil_p

सांबरा येथे मुलांना खेळाचे मोफत प्रशिक्षण

Amit Kulkarni

किणये जवळ गोवा बनावटीची दारु जप्त

Rohan_P

अवैधरीत्या वाहतूक करणाऱया 22 लाख किमतीची दारू नष्ट

Patil_p
error: Content is protected !!